Black Pepper, Ghee : तुपासोबत खा काळी मिरी पूड, रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्वचा - केसांसाठीही उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काळी मिरी पचनासाठी चांगला घटक आहे. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो. अशावेळी तुपासोबत काळी मिरी पूड खाणं तब्येतीच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात.
मुंबई : आहारात काळी मिरीचा समावेश केल्यानं जेवणाची चव तर वाढतेच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. म्हणूनच त्याला मसाल्यांचा राजा असंही म्हटलं जातं. कारण भारतीय स्वयंपाकघरात मिळणारे मसाले केवळ जेवणाची चव वाढवण्यास मदत करत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.
काळी मिरी तिखट चव आणि अनेक आरोग्य गुणधर्मांमुळेही उपयुक्त आहे. याव्यतिरिक्त, काळी मिरी पचनासाठी चांगला घटक आहे. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो. अशावेळी तुपासोबत काळी मिरी पूड खाणं तब्येतीच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्याही कमी होतात.
1. उत्तम रोगप्रतिकार शक्ती
आहारात काळी मिरीचा समावेश करणं हा तुमच्या पांढऱ्या रक्त पेशींची संख्या वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. ज्यामुळे शरीराला जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यास मदत होऊ शकते.
advertisement
2. पचन
काळी मिरी पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या उत्पादनाला चालना देते ज्यामुळे पचन सुधारतं. पोट फुगणं आणि गॅस सारख्या समस्याही काळ्या मिरीमुळे कमी होतात. ज्यामुळे आतड्यांसंबंधी समस्यांपासून आराम मिळतो.
3. चांगली त्वचा आणि केस
काळ्या मिरीमुळे त्वचारोगासारख्या त्वचेशी संबंधित समस्या कमी करण्यासाठीही उपयोग होऊ शकतो.
advertisement
4. कर्करोग प्रतिबंध
काळ्या मिरीमधल्या गुणधर्मांमुळे ट्यूमरच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे कर्करोग प्रतिबंध करण्यात मदत होऊ शकते.
5. रक्तातील साखरेची पातळी
रक्तातील ग्लुकोज चयापचय वाढवण्यासाठी आणि इंसुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी काळी मिरी उत्कृष्ट आहे, यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत होते.
advertisement
काळी मिरी आणि तूप मिश्रण कसं तयार करावं ?
काळी मिरी बारीक करुन पूड बनवा. आता एक चमचा तुपात चिमूटभर काळी मिरी पावडर मिसळा आणि
सकाळी रिकाम्या पोटी खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2024 6:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Black Pepper, Ghee : तुपासोबत खा काळी मिरी पूड, रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्वचा - केसांसाठीही उपयुक्त