advertisement

Raisins : मनुका जास्त खाऊ नका, फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या

Last Updated:

हिवाळा आला की सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातल्या मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात.

News18
News18
मुंबई : हिवाळा आला की सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातल्या मनुका आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. मनुकांमध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे अनेक गुणधर्म आढळतात. यामुळे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. आयुर्वेदातही मनुका किंवा बाकीचा सुका मेवा पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. द्राक्षं सुकवून मनुका बनवतात. त्यामुळे द्राक्षांमध्ये असलेले सर्व गुण त्यात आढळतात.
मनुका आवडीनं खात असाल तर त्याचे फायदे आणि दुष्परिणाम जाणून घेणं गरजेचं आहे. आयुर्वेदात मनुका भिजवून त्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण मनुका खाणं काही लोकांसाठी हानिकारक देखील असू शकते. कोणताही अन्न घटक जास्त खाणं वाईट तसंच आरोग्यदायी फायदे असूनही मनुकांचे काही तोटेही आहेत.
1. लोह-
मनुका हा लोहाचा चांगला स्रोत मानला जातो. ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी मनुका खाव्यात. मनुका खाल्ल्यानं ॲनिमिया दूर होऊ शकतो.
advertisement
2. पचन-
बेदाण्यामध्ये फायबरचे गुणधर्म आढळतात. जे तुमच्या पचनासाठी चांगले मानले जातात. मनुकांमध्ये आढळणारे फायबर पोटासाठी परिणामकारक आहेत. बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या समस्या दूर करण्यास मनुकांची मदत होते.
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त-
वजन कमी करण्यासाठी मनुका चांगल्या मानल्या जातात. मनुकांमध्ये असलेले ग्लुकोज फ्रुक्टोज देखील तुमच्या शरीराला प्रचंड ऊर्जा देण्यास उपयुक्त ठरु शकतात.
advertisement
मनुका जास्त खाल्ल्यानं होणारे त्रास -
1. अतिसार-
जास्त प्रमाणात मनुका खाल्ल्यानं डायरिया आणि गॅस यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मनुका मर्यादित प्रमाणातच खा.
२. मधुमेह-
टाइप-2 मधुमेहाच्या रुग्णांनी मनुका अजिबात खाऊ नये, ते त्यांच्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
advertisement
3. ऍलर्जी-
काहींना मनुकांची ऍलर्जी असते, त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी मनुका खाऊ नयेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Raisins : मनुका जास्त खाऊ नका, फायदे आणि दुष्परिणाम समजून घ्या
Next Article
advertisement
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले, ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका; वर्ल्ड मार्केटमध्ये उलथापालथ, गुंतवणूकदारांची धडधड वाढली
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले; ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका
  • सोनं-चांदीत ऐतिहासिक उसळी, गुंतवणूकदार थक्क

  • ग्लोबल मेटल मार्केटमध्ये खळबळ

  • 2008 नंतरचा सर्वात मोठा सोन्याचा झटका

View All
advertisement