Coconut, Camphor : नारळ आणि कापूर - त्वचा, केसांसाठी उपयुक्त, सांधेदुखी-सूज होते कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक पर्याय दिले आहेत. नारळाच्या तेलात कापूर मिसळून त्वचा आणि केसांवर लावलं तर या मिश्रणामुळे सांधेदुखी आणि सूज यापासूनही आराम मिळतो.
मुंबई :- शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक पर्याय दिले आहेत. यापैकी एक म्हणजे खोबरेल तेल. नारळाचं तेल त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर असल्याचं आयुर्वेद सांगतो. नारळाच्या तेलात कापूर मिसळून त्वचा आणि केसांवर लावलं तर या मिश्रणामुळे सांधेदुखी आणि सूज यापासूनही आराम मिळतो.
खोबरेल तेलामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यातील, फॅटी ऍसिडसह, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील त्यात आढळतात. दुसरीकडे, कापूरमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात. याशिवाय कापूरमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही भरपूर असतात. हे एकत्र लावल्यास त्वचेला अनेक प्रकारे फायदा होतो.
High BP : हाय बीपीची औषधं घेण्याचा कंटाळा येत असेल तर हे 8 घरगुती उपाय करा, रक्तदाब राहील नियंत्रणात
advertisement
सांधेदुखी आणि सांधेदुखीत आराम -
नारळाचं तेल आणि कापूर सांधेदुखीसाठी फायदेशीर ठरतात. या मिश्रणामुळे, सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो. तसंच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे लालसरपणाही कमी होतो. या मिश्रणानं मसाज केल्यानं सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो. खोबरेल तेल आणि कापूर यांचे मिश्रण शरीरावर लावल्यानं रक्ताभिसरण वाढतं. यामुळे स्नायूंवर आलेला ताण, थकवा दूर होण्यास मदत होते.
advertisement
त्वचेसाठी फायदेशीर -
खोबरेल तेल आणि कापूर यांचं मिश्रण त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते खोलवर जाऊन त्वचेला मॉइश्चरायझ करतं. याचा वापर केल्यानं त्वचेवरचे डाग, काळी वर्तुळं, खाज येणं आणि पुरळ यापासून आराम मिळतो. त्यामुळे त्वचेचा रंगही सुधारू लागतो. त्याचबरोबर केस लांब आणि मजबूत होतात. यामुळे केसांमधील कोंड्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यासोबतच केस गळणं आणि केस अकाली पांढरं होण्याची समस्याही कमी होऊ लागते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 6:08 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Coconut, Camphor : नारळ आणि कापूर - त्वचा, केसांसाठी उपयुक्त, सांधेदुखी-सूज होते कमी