High BP : हाय बीपीची औषधं घेण्याचा कंटाळा येत असेल तर हे 8 घरगुती उपाय करा, रक्तदाब राहील नियंत्रणात

Last Updated:

आपल्यापैकी अनेकांना मधुमेह, रक्तदाब नियंत्रणासाठीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधं आहेत, पण त्याहीपेक्षा जीवनशैलीत काही बदल केल्यानं गोळ्यांचं प्रमाण कमी करता येतील. 

News18
News18
मुंबई : आपल्यापैकी अनेकांना मधुमेह, रक्तदाब नियंत्रणासाठीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. हे दोन्ही नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधं आहेत, पण त्याहीपेक्षा जीवनशैलीत काही बदल केल्यानं गोळ्यांचं प्रमाण कमी करता येतील.
जेव्हा हृदयाचे ठोके वेगानं वाढतात तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये तितक्याच वेगानं रक्त पाठवलं जातं. जे शरीराच्या विविध भागांना रक्तपुरवठा करते. रक्तदाब हे हृदयाच्या ठोक्यांशी जोडलेल्या धमन्यांमधील रक्ताच्या दाबाचं मोजमाप आहे. जेव्हा हृदयाचा ठोका होतो तेव्हा ते रक्तवाहिन्यांमध्ये रक्त पंप करतं आणि धमन्या संपूर्ण शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पाठवतात. ही प्रक्रिया एका मिनिटात 60 ते 100 वेळा होते आणि 24 तास सतत चालू राहते.
advertisement
शरीराच्या सर्व भागांना पुरेसा पोषक आणि ऑक्सिजन मिळत असेल तर हे सामान्य रक्तदाबाचं प्रमाण आहे. उच्च किंवा कमी रक्तदाबाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करुन तुम्ही उच्च रक्तदाब कमी करु शकता.
advertisement
1. मीठ योग्य प्रमाणात खा
मीठामध्ये सोडियम मोठ्या प्रमाणात आढळतं. रोजच्या जेवणात मिठाचं प्रमाण कमी ठेवावं. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मीठाशिवाय अन्न खाण्याची सवय असणं गरजेचं आहे आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळणं खूप आवश्यक आहे.
2. सकस आहाराचा अवलंब करा
तुमच्या दैनंदिन आहारात जास्त फायबर आणि कमी चरबीयुक्त पदार्थ जसं की ताजी फळं, भाज्या आणि कडधान्यांचा वापर करा. त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. केळी, संत्री आणि टरबूज यांसारख्या फळांमध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.
advertisement
3. नियमित व्यायाम करा
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. चालणं, धावणं, सायकल चालवणं किंवा पोहणं यासारख्या शारीरिक हालचालींमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. दररोज 30 मिनिटं व्यायाम केल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो.
4. वजन कमी करा
advertisement
जास्त वजनामुळे उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते. वजन कमी केल्यानं रक्तदाब कमी होण्यास मदत होतेच पण त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. संतुलित आहार आणि नियमित व्यायामानं वजन नियंत्रित ठेवता येतं.
5. तणाव कमी करा
तणाव आणि चिंता यामुळे रक्तदाब वाढू शकतो. ध्यानधारणा, योगासनं आणि दीर्घ श्वासोच्छवासाचं व्यायाम यासारख्या तंत्रांचा अवलंब करुन मानसिक ताण कमी करता येतो. दररोज काही मिनिटं ध्यान केल्यानं शरीर आणि मन दोन्हीला आराम मिळतो आणि रक्तदाब स्थिर ठेवण्यास मदत होते.
advertisement
6. अल्कोहोलचा वापर मर्यादित करा
जास्त मद्यपान केल्यानं उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. त्यामुळे अल्कोहोल सेवनावर मर्यादा घाला.
7. धूम्रपान टाळा
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर धूम्रपान सोडणं हा रक्तदाब नियंत्रित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. धूम्रपान सोडल्यानं रक्तदाब सुधारतो आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
advertisement
8. नियमितपणे रक्तदाब तपासा
उच्च रक्तदाब आहे वेळेत ओळखण्यासाठी नियमित तपासणी करणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला तुमच्या रक्तदाबात काही असामान्य बदल जाणवले, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या रक्तदाबाचं निरीक्षण नियमित केलं तर तुम्हाला ते नियंत्रणात ठेवता येते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
High BP : हाय बीपीची औषधं घेण्याचा कंटाळा येत असेल तर हे 8 घरगुती उपाय करा, रक्तदाब राहील नियंत्रणात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement