NCP: 5 दिवसांपूर्वीच अजित पवारांना वाहिली होती श्रद्धांजली, दादांच्या निकटवर्तीय नेत्याचं निधन
- Published by:Sachin S
Last Updated:
रवींद्र नाना पगार हे सन २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्यासोबत एकेकाळी काम करणाऱ्या सहकाऱ्याचं निधन झाल्यााची वार्ता समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र नाना पगार यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. रवींद्र पगार हे अजित पवार यांचं निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या निधनामुळे नाशिकमधील कार्यकर्ते आणि समर्थकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र नाना पगार यांचं संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झालं. पगार यांचा अंत्यविधी बुधवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता उत्राने तालुका बागलाण जिल्हा नाशिक इथं त्यांच्या गावी होणार आहे.
रवींद्र नाना पगार हे सन २०१२ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार, मंत्री छगनराव भुजबळ यांचे निकटवर्तीय समजले जात होते. त्याामुळे ॲड. रवींद्र पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचं उपसभापती म्हणून काम केलं होतं.
advertisement
संघटनात्मक कामकाजाचा सुमारे ४० वर्षांचा अनुभव असलेल्या ॲड. रवींद्र पगार यांनी एकत्र काँग्रेसमध्ये युवक काँग्रेस आणि NSUI या विद्यार्थी संघटनेचं जिल्हाध्यक्षपद देखील यशस्वी रित्या सांभाळलं होतं.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तसंच विविध जिल्ह्यांना निरीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. सन १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर राज्यात सर्वप्रथम ॲड.रवींद्र पगार यांनी नाशिक येथील मामा मुंगी मंगल कार्यालयात शरद पवारांच्या समर्थनाथ मेळावा घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्व. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर ॲड. रविंद्रनाना पगार या दोन्ही नेत्यांच्या पाठीशी संपूर्ण संघटना एकसंघ ठेवली होती.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 10:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP: 5 दिवसांपूर्वीच अजित पवारांना वाहिली होती श्रद्धांजली, दादांच्या निकटवर्तीय नेत्याचं निधन










