Lust Stoires 3: वासना, प्रेम आणि गुंतागुंतीची नाती! नेटफ्लिक्सवर येतेय 'लस्ट स्टोरीज 3'; पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार 'ही' जोडी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Lust Stories 3: नेटफ्लिक्सची सर्वात गाजलेली अँथॉलॉजी सीरिज 'लस्ट स्टोरीज' आता तिसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड विषयांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी नेटफ्लिक्सची सर्वात गाजलेली अँथॉलॉजी सीरिज 'लस्ट स्टोरीज' आता तिसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी नेटफ्लिक्स इंडियाने २०२६ मधील आपल्या धमाकेदार प्रोजेक्ट्सची घोषणा केली, ज्यात 'लस्ट स्टोरीज ३' (Lust Stories 3) च्या अधिकृत अनाऊन्समेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळेस केवळ कलाकारच नाही, तर दिग्दर्शकांची फळीही तितकीच जबरदस्त आहे.
चार दिग्गज दिग्दर्शक, चार आगळ्यावेगळ्या कथा
'लस्ट स्टोरीज'च्या प्रत्येक सीझनमध्ये दिग्दर्शकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तिसऱ्या भागात चक्क विक्रमादित्य मोटवाने, शकुन बत्रा, विशाल भारद्वाज आणि 'लापता लेडीज' फेम किरण राव हे चौघे आपल्या लेन्सधून मानवी इच्छा, वासना आणि नात्यांमधील गुंतागुंत मांडणार आहेत. प्रेम, पॉवर डायनॅमिक्स आणि सामाजिक उतरंड यावर हे चौघेही भाष्य करणार आहेत.
advertisement
अली फजल आणि राधिका मदानची जोडी
यावेळेस स्टारकास्टमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. शकुन बत्रा यांच्या शॉर्टफिल्ममध्ये अली फजल आणि राधिका मदान यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर विक्रमादित्य मोटवाने यांच्या कथेत राधिका आपटे आणि विजय मुख्य भूमिकेत आहेत. किरण राव यांच्या दिग्दर्शनाखाली गुरफतेह पिरजादा आणि नवोदित अभिनेत्री सना थंपी स्क्रीन शेअर करणार आहेत. तसेच, विशाल भारद्वाज आणि अदिती राव हैदरी ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे.
advertisement
हॅट्ट्रिक करणारी पहिली भारतीय अँथॉलॉजी
नेटफ्लिक्सवर आतापर्यंत 'रे', 'अजीब दास्तान्स' किंवा 'घोस्ट स्टोरीज' सारख्या अनेक अँथॉलॉजी सीरिज आल्या, पण तीन सीझन्सपर्यंत मजल मारणारी 'लस्ट स्टोरीज' ही पहिलीच सीरिज ठरली आहे. रोनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांनी या प्रोजेक्टची निर्मिती केली आहे. महिलांच्या लैंगिकतेवर आणि सुप्त इच्छांवर निर्भीडपणे भाष्य करण्यासाठी हा शो नेहमीच चर्चेत राहिला आहे.
advertisement
जुने सीझन आणि नवीन अपेक्षा
२०१८ मधील पहिल्या सीझनमध्ये कियारा अडवाणी, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर २०२३ मध्ये काजोल, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी हा वारसा पुढे नेला. आता २०२६ मध्ये हे तिसरं सीझन प्रेक्षकांचे किती मनोरंजन करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असली, तरी ती लवकरच रिलीज होणार असल्याचे नेटफ्लिक्सने स्पष्ट केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 10:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Lust Stoires 3: वासना, प्रेम आणि गुंतागुंतीची नाती! नेटफ्लिक्सवर येतेय 'लस्ट स्टोरीज 3'; पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार 'ही' जोडी








