advertisement

'मला ते कधीच जमणार नाही', अंकुश चौधरीचा प्राजक्ता माळीबद्दल मोठा खुलासा; 'त्या' दोन गोष्टींमुळे झाला फॅन

Last Updated:
Devkhel Marathi series: एका मुलाखतीत अंकुशने प्राजक्ताचं तोंडभरून कौतुक केलं असून त्याने प्राजक्ताबद्दल आवडणाऱ्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत.
1/8
मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार अंकुश चौधरी एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी ५वर त्याची नवी सीरिज 'देवखेळ' रिलीज झाली असून यामध्ये तो प्राजक्ता माळीसोबत काम करताना दिसतोय.
मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार अंकुश चौधरी एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी ५वर त्याची नवी सीरिज 'देवखेळ' रिलीज झाली असून यामध्ये तो प्राजक्ता माळीसोबत काम करताना दिसतोय.
advertisement
2/8
३० जानेवारीला रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्राजक्ता आणि अंकुश अनेक मुलाखती देताना दिसत आहेत.
३० जानेवारीला रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या सीरिजच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्राजक्ता आणि अंकुश अनेक मुलाखती देताना दिसत आहेत.
advertisement
3/8
अशाच एका मुलाखतीत अंकुशने प्राजक्ताचं तोंडभरून कौतुक केलं असून त्याने प्राजक्ताबद्दल आवडणाऱ्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत.
अशाच एका मुलाखतीत अंकुशने प्राजक्ताचं तोंडभरून कौतुक केलं असून त्याने प्राजक्ताबद्दल आवडणाऱ्या दोन गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
4/8
प्राजक्ता आणि अंकुश यांनी याआधीही एका सिनेमामध्ये एकत्र काम केलं आहे. नुकतंच तारांगणला दिलेल्या मुलाखतीत अंकुशने प्राजक्ताच्या कामाचं कौतुक केलं.
प्राजक्ता आणि अंकुश यांनी याआधीही एका सिनेमामध्ये एकत्र काम केलं आहे. नुकतंच तारांगणला दिलेल्या मुलाखतीत अंकुशने प्राजक्ताच्या कामाचं कौतुक केलं.
advertisement
5/8
अंकुश म्हणाला,
अंकुश म्हणाला, "मला प्राजक्ताच्या दोन गोष्टी खूप आवडतात. एक तर ती महाराष्ट्राची हास्यजत्राचे सूत्रसंचालन करताना कोणताही मॉनिटर किंवा टेलिप्रॉम्पटर वापरत नाही. प्राजक्ता जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा तिचा शब्दसंग्रह असतो. एका श्वासात ती सगळ्यांची नावं घेते, सगळ्या स्पॉन्सर्सची नावं घेते. मला ते जमणार नाही. ती करेक्ट अँकरिंग करते."
advertisement
6/8
अंकुश पुढे म्हणाला,
अंकुश पुढे म्हणाला, "मला प्राजक्ताबद्दल आवडणारी दुसरी गोष्ट म्हणजे, याआधी आम्ही एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे आणि आता देवखेळमध्ये एकत्र काम केलंय. या दोन वर्षांमध्ये तिने निर्माती आणि अभिनेत्री अशा सगळ्या बाजू बघितल्या आहेत. तिच्यामध्ये झालेला हा बदल कौतुकास्पद आहे. देवखेळमध्येही प्राजक्ताने खूप चांगलं काम केलं आहे."
advertisement
7/8
कोकणातील शिमगोत्सवात शंखासुराला विशेष महत्त्व आहे. याच प्रथेवर आधारित देवखेळ या सीरिजमधील कथेची गुंफण करण्यात आली असून कोकणातील पारंपरिक उत्सवाशी साखळी हत्याकांडाची सांगड घालण्यात आली आहे.

8/8
अंकुश चौधरीसह प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, मंगेश देसाई आणि ओंकार भोजने यांसारख्या कलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
अंकुश चौधरीसह प्राजक्ता माळी, यतीन कार्येकर, अरुण नलावडे, मंगेश देसाई आणि ओंकार भोजने यांसारख्या कलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement