Fruits for hair - केसांच्या वाढीसाठी वापरा फळांचा रस, केस बनतील मुलायम आणि चमकदार

Last Updated:

केस लांब, काळेभोर आणि जाड हवे असतील तर काही फळांचे रस आहेत तुमच्या केसांचं सौंदर्य वाढवू शकतात. हे केसांच्या मुळांना लावल्यानं पुरेसं पोषण मिळतं, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस निरोगी आणि चमकदार बनतात.

News18
News18
मुंबई‌ : आहारामध्ये जेवणाव्यतिरिक्त फळांचा समावेशही असावा असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. तसंच काही फळांचा रस केसांच्या मुळांवर लावणं केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हालाही तुमचे केस लांब, काळेभोर आणि जाड हवे असतील तर काही फळांचे रस आहेत तुमच्या केसांचं सौंदर्य वाढवू शकतात. हे केसांच्या मुळांना लावल्यानं पुरेसं पोषण मिळतं, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस निरोगी आणि चमकदार बनतात.
आवळा, नारळ, काकडी, लिंबाचा रस तुमच्या केसांच्या वाढीसाठी रामबाण घरगुती उपाय ठरु शकतो.
आवळा
केसांची काळजी घेणाऱ्या सुपरफूडचा विचार केला तर आवळ्याचा नंबर सर्वात आधी येतो. कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे केस मजबूत आणि लांब होतात. त्याचबरोबर आवळ्याच्या रसामुळे केसगळती कमी होते आणि मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढतं.
advertisement
काकडी
काकडीचा रसही केसांच्या लांबीसाठी उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी काकडीचा रस टाळूवर लावा. केस जाड आणि लांब होण्यासाठी काकडीचा उपयोग होतो.
लिंबू
लिंबाचा रस देखील तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. याच्या मसाजमुळे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे केस गळणं थांबतं आणि वाढ चांगली होते.
advertisement
फणस
केसांच्या वाढीसाठी फणसाचा रस देखील चांगला आहे. फणसाचा रस काढून केसांच्या मुळांवर लावा आणि वीस ते तीस मिनिटं राहू द्या. नंतर केस चांगले धुवा.
पपई
पपईही तुमच्या केसांसाठीही रामबाण उपाय आहे. त्याचा रस मुळांवर लावल्यास केसांची वाढ चांगली होते आणि केस काळे, दाट होतात.
या सगळ्या बरोबरच तुमचा आहार कसा आहे यावर केसांचं पोषण अवलंबून आहे त्यामुळे आहाराकडेही लक्ष द्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fruits for hair - केसांच्या वाढीसाठी वापरा फळांचा रस, केस बनतील मुलायम आणि चमकदार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement