IND vs USA : 'माझ्यासोबत मस्करी करू नको', DSP सिराजची कॅप्टन सूर्यालाच धमकी, नेमका काय राडा झाला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मोहम्मद सिराज हा 24 तासापूर्वी भारतीय संघाचा भागच नव्हता.त्याला अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवडण्यात आले नव्हते. पण सराव सामन्यात हर्षित राणाला दुखापत झाली होती. या दुखापतीतुन लगेच सावरू शकत नव्हता.
INDIA vs USA : वानखेडेच्या मैदानावर आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताने 29 धावांनी अमेरिकेचा पराभव केला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 161 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिका फक्त 132 धावांपर्यंत मजल मारू शकली होती. त्यामुळे भारताने 29 धावांनी हा सामना जिंकला होता. या विजयासह भारताने वर्ल्ड कपला चांगली सूरूवात केली होती.
भारताच्या या विजयानंतर बोलताना मोहम्मद सिराजने एक किस्सा सांगितला होता. हा किस्सा ऐकूण सर्वांनाच धक्का बसला होता. त्याचं झालं असं की मोहम्मद सिराज हा 24 तासापूर्वी भारतीय संघाचा भागच नव्हता.त्याला अंतिम 15 खेळाडूंमध्ये निवडण्यात आले नव्हते. पण सराव सामन्यात हर्षित राणाला दुखापत झाली होती. या दुखापतीतुन लगेच सावरू शकत नव्हता.त्यामुळे भारताला त्याच्या जागी नवीन खेळाडूंना संघात संधी द्यावी लागली आणि त्यात सिराजची लॉटरी लागली.
advertisement
पण पुढे गंमत अशी झाली की जेव्हा सूर्याने मोहम्मद सिराज कॉल करून याबाबत माहिती दिली.त्यावेळेस त्याला सूर्या मस्करी करत असल्याचे वाटले. त्यामुळे त्याने सूर्याला धमकी दिली होती. या घटनेबाबत बोलताना सिराज म्हणाला, "काल मला सूर्या भाईंचा फोन आला, त्यांनी मला सांगितले की 'मियां, तुझे सामान पॅक कर आणि संघात सामील हो'. मी सूर्या भाईंना सांगितले की माझ्यासोबत खेळू नको, कारण मला वाटले की तो मस्करी करतो आहे. पण प्रत्यक्षात त्याला संधी मिळाली होती. तसेच घरच्या मैदानावर टी20
advertisement
विश्वचषक खेळणे हे माझे स्वप्न होते, ते लिहिले होते म्हणून मी इथे आहे, असे देखील सिराज पुढे म्हणाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 12:00 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs USA : 'माझ्यासोबत मस्करी करू नको', DSP सिराजची कॅप्टन सूर्यालाच धमकी, नेमका काय राडा झाला?









