लिफ्टमध्ये फक्त गॅसने भरलेले फुगेच नाही तर इतरही अनेक वस्तू धोकादायक ठरू शकतात. या वस्तूही लिफ्टमध्ये नेऊ नये. कारण त्या वस्तूंचाही अशाच प्रकारे स्फोट होण्याची शक्यता असते. चला पाहूया त्या वस्तू कोणकोणत्या आहेत.
लिफ्टमध्ये या वस्तू नेणं टाळा..
काही लोकांना सिगारेट किंवा बिड्या पिण्याची सवय असते. त्यामुळे वस्तू कायम त्यांच्या जवळच असतात. मात्र लिफ्टमध्ये सिगारेट किंवा लाईटरसारख्या वस्तू ज्वलनशील वस्तू नेने टाळावे आणि आतमध्ये पेटवणे तर अजिबातच चुकीचे आहे. लिफ्टमध्ये काडी पेटवणेदेखील मोठी दुर्घटना घडवू शकते.
advertisement
लिफ्टमधील जागा बंदिस्त असते. लिफ्ट वर-खाली होत असताना तापमान बदलते. मर्यादित जागेत गॅस जमा झाल्यास छोट्याशा ठिणगीचाही स्फोट होऊ शकतो. म्हणून लिफ्टमध्ये फटाके किंवा इतर लहान स्फोटक साहित्य नेणेही टाळावे.
काहीवेळा कामासाठी लोक लिफ्टमध्ये इन्व्हर्टर बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन जातात. या वस्तूंच्याबाबतीतही निष्काळजीपणा आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. कारण बंद लिफ्टमध्ये या वस्तू जीवघेण्या ठरू शकतात.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
