advertisement

महाराष्ट्रातलं रताळ्यांचं गाव! महाशिवरात्रीला लाखात कमाई, शेतकऱ्यानं सांगितलं फायद्याचं गणित, Video

Last Updated:

Agriculture: लोणगाव हे तर रताळ्यांचं गाव म्हणूनच ओळखलं जातंय. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे 1 ते 5 एकरपर्यंत रताळ्याची शेती असते.

+
महाराष्ट्रातलं

महाराष्ट्रातलं रताळ्यांचं गाव! महाशिवरात्रीला लाखात कमाई, शेतकऱ्यानं सांगितलं फायद्याचं गणित, Video

जालना: सध्याच्या काळात मराठवाड्यातील शेतकरीही आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत आहेत. जालन्यातील भोकरदन तालुक्यात असणारं लोणगाव हे तर रताळ्यांचं गाव म्हणूनच ओळखलं जातंय. या गावातील प्रत्येक शेतकऱ्याकडे 1 ते 5 एकरपर्यंत रताळ्याची शेती असते. याच गावातील शेतकरी ज्ञानेश्वर खांडेभराड यांनी दीड एकर शेतात रताळी लागवड केली असून त्यांना यातून 3 लाख रुपये मिळणार आहे. या रताळे शेतीबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
जून महिन्यात सरी काढून रताळी काडीची लागवड केली. पावसामुळे चार महिने पाणी देण्याची गरज पडत नाही. यानंतर युरिया आणि इतर खतांच्या मात्रा देण्यात आल्या. या पिकावर आलेल्या रोग नियंत्रणासाठी दोन फवारण्या केल्या. फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री असल्याने सध्या रताळी काढण्याचे काम सुरू आहे, असे ज्ञानेश्वर सांगतात.
advertisement
दीड एकर रताळे शेतीतून 150 क्विंटल उत्पादन मिळेल असा अंदाज आहे. याला 15 रुपये प्रति किलो पर्यंत दर मिळतो. दीड एकरात तीन लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे खांडेभराड यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनी देखील रताळ्यांची शेती केल्यास ती फायदेशीर ठरेल असंही ते सांगतात.
दरम्यान, पारंपरिक पिकांपेक्षा या पिकाला खर्च कमी असून उत्पादन देखील चांगले मिळते. विशेष म्हणजे शेतावरूनच व्यापारी या रताळ्याची खरेदी करतात. यामुळे शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. या रताळ्याची मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये विक्री केली जाते. व्यापारी हा माल इतर शहरात पाठवतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
महाराष्ट्रातलं रताळ्यांचं गाव! महाशिवरात्रीला लाखात कमाई, शेतकऱ्यानं सांगितलं फायद्याचं गणित, Video
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement