Missing Link: 'मिसिंग लिंक'मुळे फक्त सुपरफास्ट नाही, तर सुरक्षितही होणार मुंबई-पुणे प्रवास, नव्या मार्गावर या गाड्यांना 'नो एन्ट्री'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मिसिंग लिंकवरील प्रवास केवळ जलदच नाही, तर 'झिरो रिस्क' करण्यासाठी प्रशासनाने मोठा बदल केला आहे
पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नुकत्याच घडलेल्या गॅस गळतीच्या भीषण घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. ३२ तास महामार्ग ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर, बहुप्रतिक्षित 'मिसिंग लिंक' प्रकल्पाबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली आहे. मिसिंग लिंकवरील प्रवास केवळ जलदच नाही, तर 'झिरो रिस्क' करण्यासाठी प्रशासनाने मोठा बदल केला आहे. या १९.८० किमीच्या नवीन मार्गिकेवरून कोणत्याही प्रकारची स्फोटके, गॅस टँकर किंवा ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.
वाहतुकीच्या नियमांनुसार अशा वाहनांवर बंदीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे बोगद्यामध्ये किंवा घाटात गॅस गळती किंवा स्फोट होऊन होणाऱ्या मोठ्या दुर्घटनांची भीती कायमची मिटणार आहे.
अडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्यानंतर ३२ तास वाहतूक ठप्प होती. जर 'मिसिंग लिंक' सुरू असती, तर प्रवाशांना तात्काळ पर्यायी मार्ग उपलब्ध झाला असता. मिसिंग लिंकमुळे वेळेची बचत होऊन प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होईल.बोरघाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळता येतील. याशिवाय प्रवासाचे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. ज्यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल.
advertisement
सुमारे ६,६९५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारने एमएसआरडीसीला (MSRDC) काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. खोपोली ते कुसगाव या १९ किमीच्या टप्प्यात आशियातील सर्वात रुंद बोगदे आणि उंच पूल बांधण्यात आले आहेत. येत्या काही महिन्यांत ही मार्गिका खुली झाल्यावर प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेता येईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 1:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Missing Link: 'मिसिंग लिंक'मुळे फक्त सुपरफास्ट नाही, तर सुरक्षितही होणार मुंबई-पुणे प्रवास, नव्या मार्गावर या गाड्यांना 'नो एन्ट्री'






