advertisement

शूSSS आवाज खाली! Bigg Boss Marathi 6 च्या घरात सगळ्यांना मिरची लावायला येतेय ड्रामा क्वीन; राखी सावंतची एंट्री कधी?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत तिने स्वत:च सांगितलं आहे.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 च्या घरात चौथ्या आठवड्यात धक्क्यावर धक्के मिळत आहेत. अशात आता ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री होणार असल्याची चर्चा आहे. खरंच राखी सावंत बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये येणार की नाही, याबाबत तिने स्वत:च सांगितलं आहे. तिचा व्हिडीओ समोर आला आहे. यात राखी बिग बॉसच्या घरात राडा घालणार, धिंगाणा घालणार, सगळ्यांना मिरची लावणार असं म्हणताना दिसते.
बिग बॉस आणि राखी सावंत म्हणजे प्रेक्षकांसाठी एक समीकरण झालं आहे. बिग बॉस हिंदीसह बिग बॉस मराठीतही गेल्या अनेक सीझन्सपासून राखी सावंतला चाहते पाहत आहेत.  बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये राखी सावंत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. शिवाय, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एक ते दोन दिवसांसाठी राखी सावंत आली होती. आता देखील राखी 15 दिवसांसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
याबाबत राजश्री मराठीशी बोलताना राखीने सांगितलं की, मला याबाबत बोलायला परवानगी नाही. पण जर मी बिग बॉस मराठीच्या घरात आली आली तर राडा घालणार, धिंगाणा घालणार, सगळ्यांना मिरची लावणार. असं सांगते. शूSSS आवाज खाली, 20 पावलं मागे, असंही ती म्हणते.
advertisement
advertisement
आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखली जाणारी राखी प्रेक्षकांसह स्पर्धकांचेही खळखळून मनोरंजन करते. तिच्या वक्तव्यांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
शूSSS आवाज खाली! Bigg Boss Marathi 6 च्या घरात सगळ्यांना मिरची लावायला येतेय ड्रामा क्वीन; राखी सावंतची एंट्री कधी?
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement