Bigg Boss Marathi 6 च्या घरातील त्या चोरीचा पर्दाफाश! 'तो' चोर भाऊच्या धक्क्यावर समोर आला, रितेश देशमुखने चोरीची क्लिपच दाखवली
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात चौथ्या आठवड्यात झालेल्या चोरी प्रकरणात विशाल कोटियन आणि रोशन भजनकरला सामान सापडलं. तन्वी कोलते, राकेश बापट, प्रभू शेळके यांनी आपल्यावरील चोरीचे आरोप फेटाळले आहेत. पण मग खरा चोर कोण? तो भाऊच्या धक्क्यावर समोर येणार आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील चौथ्या आठवड्यात पहिल्या दिवशी झालेल्या चोरीचा खुलासा आता होणार आहे. चोरीचा आरोप तन्वीवर लावण्यात आला, तन्वीने आपल्यावरील आरोप फेटाळले. त्यानंतर आता तो खरा चोर कोण हे आठवड्याच्या शेवटी समोर येणार आहे. भाऊच्या धक्क्यावर चोरीचा पर्दाफाश होणार आहे. चोरीची क्लिपच दाखवली जाणार आहे. रितेश देशमुख चोरीची क्लिप दाखवणार असल्याचं सांगतो.
बिग बॉसच्या घरात चोरीचं प्रकरण काही नवं नाही. याआधीही चोरी झाल्यात आहेत. त्यावेळी चोर कोण ते समजलं. किंबहुना चोरी करणाऱ्या सदस्यांनी स्वतःच त्याची कबुली दिली. आता मात्र चौथ्या आठवड्यात झालेल्या चोरीची जबाबदारी कोणीच घेतली नाही. रेशन चोरीला गेलं होतं आणि ते सामान विशाल आणि रोशनला तन्वीच्या बेडजवळ सापडल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे सगळे तन्वीवर चोरीचा आरोप लावतात.
advertisement
तन्वी ओरडून ओरडून सांगते ही आपण चोरी केली नाही. आपण राकेशच्या हातात फक्त पिठाचं कंटेनर दिलं होतं, ज आपलं सामान म्हणून आपल्या बेडमध्ये ठेवण्यासाठी दिलं होतं असं सांगते. तरी पण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही. घरातील सगळे सदस्य तन्वीवर तुटून पडतात. तन्वीला हे सगळं सहन होत होत नाही. ती रडू लागते, वैतागते आणि आपल्याला हा शो करायचा नसल्याचं ती सांगते. कॅमेऱ्यासमोर येत ती आपल्याला चोर म्हटलं गेलं आहे, हे आपल्याला सहन होणार नाही. असं सांगताना दिसते.
advertisement
यानंतर चोरीची चर्चा घरात होत असते, पण खरा चोर कोण हे मात्र अद्याप समोर आलं नाही. आता भाऊच्या धक्क्यावर याचा खुलासा होणार आहे. भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रितेश या आठवड्यात झालेल्या चोरीबाबत बोलतो.
रितेश तन्वीला सांगतो, तन्वी एखादा रबर इतका ताणू नका की स्वत:लाच लागेल गेल्या आठवड्यात एक मोठा शब्द समोर आला चोरी केली गेली तन्वी तुम्ही विषय वाढवला की मला चोर म्हटलं जातंय इथं चोरीची मी क्लिप प्ले करणार.
advertisement
advertisement
हे ऐकताच घरातील सगळ्या सदस्यांच्या चेहऱ्याचा रंग उडतो. अनुश्री तोंडावर हात ठेवते, तन्वी डोळे बंद करते तर कुणीतरी ओ शीट असं म्हणतं. आता नेमका चोर कोण? हे येणाऱ्या एपिसोडमध्ये समजेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 12:36 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील त्या चोरीचा पर्दाफाश! 'तो' चोर भाऊच्या धक्क्यावर समोर आला, रितेश देशमुखने चोरीची क्लिपच दाखवली








