कढीपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. पानांमध्ये जीवनसत्त्व ए, बी, सी, ई, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, बीटा कॅरोटीन, प्रथिनं, दाहक-विरोधी गुणधर्म आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. या घटकांमुळे, पानं शरीरासाठी फायदेशीर ठरतात. कडिपत्त्याच्या पानांमुळे, ॲनिमियापासून बचाव करता येतो, शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. कडिपत्ता खाणं दृष्टीसाठी चांंगलं आहे. संसर्गाशी लढा देण्यात कडिपत्ता उपयुक्त आहे. कडिपत्ता, वजन कमी करण्यासाठी वरदान मानला जातो. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यानं चयापचय क्रिया सुधारते. कढीपत्ता वजन कमी करण्यातही उपयुक्त ठरतो. ज्यामुळे शरीराचं वजन जास्त प्रमाणात वाढत नाही.
advertisement
Cough : सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय, तुमच्या घरातच आहे उत्तर
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणासाठी उपयुक्त -
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. ही पानं चघळल्यानं रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित राहतं. मधुमेह व्यवस्थापनासाठी, कढीपत्त्याची पानं दररोज रिकाम्या पोटी चघळणं चांगलं.
Navratri 2024: नवरात्रीत कांदा-लसूण का खात नाही? खरं कारण तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल
केस मजबूत होतात -
कढीपत्त्यामध्ये आढळणाऱ्या बीटा-कॅरोटीन आणि प्रथिनांचा केसांच्या वाढीसाठी फायदा होतो. यामुळे केस मजबूत होतात, आणि केस गळणं कमी होतं.
तोंडाची चांगली स्वच्छता -
मौखिक आरोग्य राखण्यासाठी कढीपत्ता चावून खाऊ शकतो. कढीपत्ता चघळल्यानं तोंडातील बॅक्टेरिया निघून जातात आणि तोंड स्वच्छ राहतं.
त्वचा आणि केस सुधारण्यासाठी तसंच कडिपत्ता डोळ्यांसाठी, यकृतासाठीही फायदेशीर आहे. कडिपत्त्यामुळे, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. तुम्हाला नुसता कडिपत्ता खायचा नसेल तर तुम्ही कडिपत्त्याची चटणी करु शकता. जेणेकरुन कडिपत्त्याचा आहारात समावेश होईल.