TRENDING:

Birthday Wishes : आई-बाबा, नवरा बायको, मित्र.. सर्वांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त एका क्लीकवर!

Last Updated:

Birthday Wishes In Marathi : आपल्या आयुष्यात खूप नाती असतात आणि सर्वच लोकं आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची असतात. त्यांच्या वाढदिवशी फार काही नाही तर तर किमान त्यांना शुभेच्छा देणं तरी आवश्यक असतं. म्हणूनच तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यासाठी आम्ही सुंदर शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या आयुष्यात खूप नाती असतात आणि सर्वच लोकं आपल्यासाठी तितकीच महत्त्वाची असतात. त्यांच्या वाढदिवशी फार काही नाही तर तर किमान त्यांना शुभेच्छा देणं तरी आवश्यक असतं. म्हणूनच तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्यासाठी आम्ही सुंदर शुभेच्छा घेऊन आलो आहोत...
वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा खास आपल्या लोकांसाठी
वाढदिवसाच्या मराठी शुभेच्छा खास आपल्या लोकांसाठी
advertisement

वाढदिवसाच्या सुंदर सुंदर मराठी शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी, आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी, एकमेव व्यक्ती म्हणजे माझी 'आई'.. आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..!

आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा, तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात आणि कायम राहणार.. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा बाबा..!

advertisement

जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती, तेव्हा तू मला साथ दिलीस, माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलास, थँक्यू भावा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा..!

तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझ्या जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा.. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

advertisement

उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी, तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी, तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी, हवी असलेली प्रत्येक गोष्ट माझ्या लाडक्या लेकीला मिळावी.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा..!

तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका लेक, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)..!

advertisement

आजी, आपण एकत्र घालवलेला प्रत्येक दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे, तू मला तुझे प्रेम आणि तुझ्या अनुभवाची शिदोरी दिली, मला एक चांगली व्यक्ती बनण्यास मदत केली.. जगातल्या सगळ्यात बेस्ट आजीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आजोबा, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात, माझ्या पाठीशी तुम्ही नेहमीच खंबीरपणे उभे असता, नेहमी मला हसवता, नेहेमी मला प्रेरणा देता, तुम्ही अजून शंभर वर्षे जगावे हीच देवाकडे प्रार्थना.. तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

advertisement

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले, अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार, प्रिया नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारांमध्ये माझी साथ दिली, मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते, अशा माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणेच जीव लावणारी, माझे सर्व हट्ट पुरवणारी माझी लाडकी माऊ.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशी..!

उंबरठ्याचे माप ओलांडून घरी आलीस वहिनी बनून, पण कधी झालीस मैत्रीण हे कळलंच नाही.. वाहिनी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

आपलंस करुन घेण्यासाठी पोटीच घ्यावा लागत नाही जन्म, काका तुम्ही आहात माझा आधारस्तंभ.. तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!

आपल्यासोबत मजा मस्ती करेल आणि आपल्यासाठी आई-बाबांनाही समजावेल, काहीही झालं तरी मला कायम धीर देणाऱ्या माझ्या काकूला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

तू माझा आदर्श आहेस, कठोर परिश्रम आणि चिकाटी यशाकडे घेऊन जाते याचे तू प्रतीक आहेस, तुला दीर्घायुष्य आणि खूप यश लाभो.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा..!

आयुष्यातील तुमची जागा, कोणी घेऊ शकत नाही, तुमच्या एवढी माया भाच्यांना कोणी देऊ शकत नाही.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामी..!

सून माझी भासे मला माझ्या मुलीसारखी, कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी, करते सर्वांचा आदर, कधी रागावलं कुणी, तरी त्यांचा राखते मान, भाग्य लागते तुझ्यासारखी सून मिळायला.. सूनबाई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!

आपल्या चांगल्या स्वभावाने, तुम्ही नेहमी आमचा मान वाढवला आहे, जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपली स्वप्ने पूर्ण होवोत हीच आमची प्रार्थना आहे.. जावईबापू तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

वडिलांनी जगणे शिकवले, सासऱ्यांनी पुढे जाण्याचा मार्ग दाखवला, खरंच खूप नशीबवान आहे मी की, मला वडील आणि सासऱ्यांचा आशीर्वाद मिळाला.. वाढदिवसाच्या शुभेच्छा सासरेबुवा..!

नात्याने असाल तुम्ही माझ्या सासूबाई, पण त्याहून आपण चांगल्या मैत्रिणी आहोत, सुख दुःखात एकमेकांना साथ देणाऱ्या सहचारिणी आहोत, अशा सासूबाई म्हणजेच माझ्या गोड आईंना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

आजच्या दिवशी या अंगणात एक छोटीशी परी आली, जिच्यामुळे मला सुखाची एक नवी व्याख्या कळली, माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

ज्याच्यावर सगळ्यात मनापासून प्रेम करतो, तो भाचा आहे आमच्या सगळ्यांचं पहिले प्रेम, भाच्या तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही. कारण मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला.. वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा..!

साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या, तोंड उघडल्यावर शिव्याच बोलणाऱ्या, पण मनाने साफ असणाऱ्या आमच्या या मैत्रिणीला, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

तू आणि मी अजिबातच वेगळे नाही, तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी सर्व काही आहेस.. माझ्या राणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

कितीपण राग आला तरी समजून घेतोस मला, रूसल्यावर पाठी पाठी येतोस, खुप हसवतोस, माझ्यासाठी काहीपण करतोस, आज तुझ्यासाठी काहीतरी करण्याचा दिवस आहे, म्हणून सांगते I Love You.. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा राजा..!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात, मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात, अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही.. म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह, अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा..!

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झालाय थोडा लेट, पण शुभेच्छा येतील तुला थेट, वाढदिवसाच्या लै शुभेच्छा..!

बॉसचा चमचा म्हणून आहे ज्याची ओळख, त्याचा आहे आजचा खास दिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छा चमचा..!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी त्याला हसतमुखाने सामोरे जाणे सोपे नाही, आयुष्याची 50 वर्षे आनंदात व उत्साहात व्यतीत केल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा.. तुमच्या पुढील आयुष्यात आनंदाची भर पडत राहो हीच इच्छा.. Happy 50th Birthday..!

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Birthday Wishes : आई-बाबा, नवरा बायको, मित्र.. सर्वांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा फक्त एका क्लीकवर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल