TRENDING:

Kids Lunch Recipe : मुलं भोपळा खात नाही? बनवा टेस्टी भोपळ्याचे पॅनकेक्स, मुलांना कळणारही नाही काय खाल्लं..

Last Updated:

Kids Lunch Recipe Bhopla Pancakes : आज आपण पाहणार आहोत, मुलांना भोपळा खाऊ घालण्याची टेस्टी पद्धत. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याचे पॅनकेक्स कसे बनवायचे ते सांगणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुलं नेहमीच भाज्या खायला नाकं मुरडतात. त्यांना नेहमीच काहीतरी वेगळे, स्ट्रॉंग चवीचे आणि दिसायला आकर्षक पदार्थ हवे असतात. त्यातही भोपळ्यासारख्या भाज्या तर मुलं नवा ऐकूनच खायला नकार देतात. पण त्यांना भाज्या खाऊ घालणंही तितकंच आवश्यक असतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला याचा एक सोपा उपाय सांगत आहोत.
भोपळ्याचे पॅनकेक्स..
भोपळ्याचे पॅनकेक्स..
advertisement

आज आपण पाहणार आहोत, मुलांना भोपळा खाऊ घालण्याची टेस्टी पद्धत. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याचे पॅनकेक्स कसे बनवायचे ते सांगणार आहोत. इंस्टाग्रामवर foodie_gujarati11 वर ही सोपी रेसिपी शेअर केली आहे. चला पाहूया ते कसे बनवायचे.

भोपळ्याचे पॅनकेक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य..

- किसलेला भोपळा

- रवा

- तांदळाचे पीठ

- कोथिंबीर

advertisement

- काळे तीळ

- हिरवी मिरची

- मीठ

- पांढरे तीळ

- मोहरी

- तूप

- हिंग

- फ्रुट सॉल्ट किंवा इनो

- लिंबू

भोपळ्याचे पॅनकेक्स बनवण्याची कृती..

- सर्वात आधी किसलेला भोपळा घ्या. त्यामध्ये कोथिंबीर, काळे तीळ, हिरवी मिरची, मीठ, रवा आणि तांदळाचे पीठ टाका.

- त्यानंतर यामध्ये दही टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा.

advertisement

- सर्व मिश्रा व्यवस्थित एकजीव झाले की ते काही वेळासाठी बाजूला ठेवा. जेणेकरून रवा भिजण्यासाठी वेळ मिळेल.

- काही वेळानंतर हे मिश्रण व्यवस्थित सेट होते.

- आता यामध्ये इनो किंवा फ्रुट सॉल्ट टाका, वरून लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण परत एकत्र करून घ्या.

- त्यानंतर एका छोट्या पॅनकेक्सच्या पॅनमध्ये तूप घाला. तूप गरम झाले की त्यात मोहरी, पांढरे तीळ आणि हिंग घाला. वरून लगेच थोडे मिश्रण टाका.

advertisement

- आता हे झाकून एका बाजूने व्यवस्थित भाजू द्या. त्यानंतर ते फ्लिप करा आणि दुसऱ्या बाजुनेही व्यवस्थित भाजून घ्या.

अशाप्रकारे तुमचे हेल्दी आणि टेस्टी भोपळ्याचे पंकेसक तयार हातात. हे मुलांच्या डब्यात खायला द्या. त्यांना खूप आवडतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना कळणारही नाही की यामध्ये भोपळा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच शेतात घ्या वेगवेगळी पिकं, सोपी पद्धत अन् उत्पन्नातही वाढ, असा हा फॉर्म्युला
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kids Lunch Recipe : मुलं भोपळा खात नाही? बनवा टेस्टी भोपळ्याचे पॅनकेक्स, मुलांना कळणारही नाही काय खाल्लं..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल