16व्या शतकात फ्रेंच मद्य अतिशय लोकप्रिय होतं. डच लोक ते मोठ्या प्रमाणात विकत घेऊन जागतिक स्तरावर वितरित करण्यास उत्सुक होते; पण ते प्रवासाच्या दृष्टिकोनातून बनवली जात नसल्याने ते पाठवणं कठीण होतं. त्या मद्याची बाटली जास्त जागा व्यापू नये यासाठी तिचा आकार कमी करण्याकरिता ती डिस्टिल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यातलं अल्कोहोलचं प्रमाण आणखी वाढलं. सामान्य वाइनचं रूपांतर एका स्वादिष्ट सॉलिड स्पिरिटमध्ये करण्यात आलं. ते आजही कायम आहे. यात 35 ते 60 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असतं. सध्या जगभरात तिचं उत्पादन होतं आणि वेगवेगळ्या प्रकारात ती उपलब्ध आहे.
advertisement
कॉग्नाक आहे सर्वांत लोकप्रिय ब्रँड
ब्रँडीचा उगम फ्रान्समध्ये झाला असं मानलं जात असलं, तरी आता ती जगभरात तयार केली जाते. सर्वांत प्रसिद्ध ब्रँडी फ्रान्सच्या कॉग्नाक प्रांतातली आहे. ब्रँडीचा कॉग्नाक हा सर्वांत लोकप्रिय ब्रँड आहे. ब्रँडी फ्रान्सच्या कॉग्नाक प्रांतातल्या द्राक्षांपासून बनवली गेली असेल तरच ती कॉग्नाक ब्रँडी मानली जाते. इतर लोकप्रिय ब्रँड्समध्ये अरमाग्नॅक, पिस्को आणि ग्रेप्पाचा समावेश आहे. ज्याप्रमाणे मद्यपान करणाऱ्यांसाठी व्हिस्की हा सामान्य पर्याय आहे, त्याचप्रमाणे सामान्यतः रात्री जेवणानंतर ब्रँडीचा आनंद एक पेय म्हणून घेतला जातो. ब्रँडी सॉफ्ट आणि चवीला अत्यंत गोड असते. ब्रँडीपासून कॉकटेलदेखील बनवलं जातं. यात साइडकार, व्हिएक्स कॅरे, ब्रँडी मॅनहॅटन आणि ब्रँडी ओल्ड फॅशनचा समावेश आहे.
आरोग्यासाठी उपयुक्त आहे का?
जाणकारांच्या मते, अल्प प्रमाणात ब्रँडी प्यायल्यास झोपेशी संबंधित समस्या दूर होतात. ब्रँडीमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, तसंच ते कार्यक्षम राहण्यास मदत होते. ब्रँडीतली काही मिश्रणं आणि अॅसिडमुळे कॅन्सर पेशींचा विकास आणि प्रसार रोखला जातो. अन्नपचन आणि पचनसंस्थेकरिता ब्रँडी हितावह मानली जाते. त्यामुळे घरात ब्रँडीची एक तरी बाटली असणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रसंगासाठी ब्रँडी हा एक चांगला पर्याय आहे. हे एक चविष्ट पेय असून, त्यामुळे जेवण किंवा पार्टी रंगतदार होते. हे एक महागडं पेय असून, भेट म्हणून देण्याकरिता चांगला पर्याय ठरू शकतं.
