Success Story : नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुण्यात आल्यानंतर विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. मात्र या नोकऱ्यांमधून घरखर्च भागत नसल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पुणे: तुमच्याकडे जिद्द, इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर ना शिक्षण आडवं येतं ना परिस्थिती. सोलापूर जिल्ह्यातून स्वप्नं घेऊन पुण्यात आलेलं सत्यवान आणि अश्विनी थोरबोले हे दाम्पत्य याचं उत्तम उदाहरण आहे. गावाकडे रोजंदारीवर काम करणाऱ्या या दाम्पत्याने पुण्यात आल्यानंतर विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या. मात्र या नोकऱ्यांमधून घरखर्च भागत नसल्याने त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्केटचा अभ्यास करून त्यांनी चपाती आणि भाकरी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मेहनत आणि नियोजनाच्या जोरावर आज ते या व्यवसायातून महिन्याला 60 ते 70 हजार रुपयांची कमाई करत आहेत. त्यांच्या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
अश्विनी थोरबोले यांनी सांगितले की, आम्ही मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहोत. गावाकडे रोजंदारीवर काम करत होतो. मात्र दिवसभर उन्हातान्हात काम करूनही फक्त 300 ते 400 रुपयेच मिळायचे. त्यामध्ये घरखर्च भागत नव्हता. अखेर आम्ही पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. पुण्यात आल्यानंतर पुढे काय करायचं, हा मोठा प्रश्न होता. आमचं दोघांचंही शिक्षण कमी असल्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळत नव्हती. त्यानंतर माझे पती सत्यवान थोरबोले यांनी दूध डेअरीवर काम सुरू केलं. मात्र त्यातूनही घरखर्च भागत नव्हता. त्यातच घरभाडं देणंही आमच्यासाठी मोठं आव्हान ठरत होतं, त्यामुळे व्यवसाय करायचं ठरवलं.
advertisement
व्यवसायातून महिन्याला 70 हजारांपर्यंत कमाई
अश्विनी थोरबोले यांनी पतीला साथ देण्यासाठी काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मार्केटचा अभ्यास केला आणि चपाती-भाकरी बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. या व्यवसायासाठी त्यांनी चपाती आणि भाकरी बनवण्यासाठी ऑटोमॅटिक मशीन खरेदी केली.
या मशीनच्या सहाय्याने त्यांनी आपला हा व्यवसाय सुरू केला. सध्या पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध हॉटेल्स आणि मेसमध्ये त्या चपात्या आणि भाकऱ्या पुरवतात. दररोज जवळपास 3000 चपात्या तयार केल्या जात असून, यातून त्यांना दिवसाला दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळतं. सर्व खर्च वजा करता त्यांची महिन्याची कमाई तब्बल 60 ते 70 हजार रुपयांपर्यंत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 1:30 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
title=घरखर्च भागेना म्हणून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला 60 ते 70 हजारांची कमाई 







