Broken Crockery Reuse : तुटलेल्या कप, बशी आणि प्लेट्सचा असा वापर तुम्ही पहिला नसेल! पाहा भन्नाट रियुज आयडिया
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
हे फुटलेले कप आणि प्लेट फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा उत्तम प्रकारे वापर करू शकता. थोडी कल्पकता वापरून या फुटलेल्या वस्तुंपासून अनोख्या घरगुती वस्तू बनवू शकता.
मुंबई : फुटलेले कप अनेकजण फेकून देतात. ते निरुपयोगी झाले आहेत असे समजून तुम्ही देखील अनेकदा फुटलेले कप किंवा काचेची भांडी फेकून दिली असतील. परंतु हे फुटलेले कप आणि प्लेट देखील अतिशय कामाचे असतात. ते फेकून देण्याऐवजी तुम्ही त्याचा अतिशय उत्तम प्रकारे वापर करू शकता. थोडी कल्पकता वापरून या फुटलेल्या वस्तुंपासून अनोख्या घरगुती वस्तू बनवू शकता. या वस्तु तुमच्या घराची शोभा वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.
बागेसाठी 'नामफलक'
अनेक घरात स्टीलच्या प्लेटऐवजी प्लेट वापरल्या जातात. अनेकदा काम करताना या प्लेट्स फुटतात. ती फुटलेली प्लेट निरुपयोगी झाल्याचे समजून अनेकजण ती फेकून देतात. पण तुम्ही असं न करता त्याचा चांगला वापर करून घेऊ शकता. या फुटलेल्या प्लेटपासून तुम्ही तुमच्या बागेत वेगवेगळ्या झाडांसाठी नामफलक तयार करू शकता. त्यावर एखाद्या रोपाचे नाव लिहा आणि कुंडीत गाडून सेट करा. यामुळे तुमच्या बागेला एक सुंदर 'व्हिंटेज लूक' मिळेल आणि तुम्हाला झाडं ओळखणंही सोपे जाईल.
advertisement
तुटलेल्या तुकड्यांपासून 'मोझेंक कला'
तुमच्या घरात फुटलेल्या भांड्यांचे तुकडे असतील आणि ते तुम्ही फेकून देण्याचा विचार करत असाल तर त्याऐवजी तुम्ही ते जुन्या फुलदाण्यांवर किंवा फोटो फ्रेम्सवर चिकटवू शकता. यामुळे साध्या वस्तूंनाही एक दर्जेदार रूप येतं. हे आर्ट पाहून तुमच्या घरात येणारे पाहूणे देखील इम्प्रेस होतील.
चाव्या ठेवण्यासाठी ट्रे बनवा
तुमच्या आवडत्या प्लेटचा एखादा कोपरा तुटला असेल तर त्या प्लेटचा वापर तुम्ही चाव्या, घड्याळं किंवा अंगठ्या ठेवण्यासाठी ट्रे म्हणून करू शकता. ही प्लेट तुम्ही तुमच्या घरातील भिंतीवर सेट करू शकता. यामुळं तुमच्या चाव्या एका ठिकाणी राहतील आणि त्या तुम्हाला सहज सापडलती.
advertisement
पक्ष्यांसाठी वापरू शकता
तुमच्या घरातील फुटलेली जुनी, खोल भांडी तुम्ही या उन्हाळ्यात पक्षांसाठी देखील वापरू शकता. या प्लेटमध्ये किंवा कपमध्ये पाणी भरा आणि ते तुमच्या घराच्या छतावर किंवा बाल्कनीमध्ये ठेवा. पक्ष्यांना इजा होऊ नये म्हणून त्याची टोकदार कोपरे घासून गुळगुळीत करा.
कुंडीखाली ठेवा
तुमच्या घरातील फुटलेल्या प्लेट सजावटीसाठी उपयुक्त नाही असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांचा वापर तुम्ही कुंड्यांखाली करू शकता. या प्लेट कुंडीखाली ठेवल्याने झाडांमधील अतिरिक्त पाणी त्यात शोषले जाईल आणि तुमची फरशी आणि बाल्कनी घाण होणार नाही.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 1:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Broken Crockery Reuse : तुटलेल्या कप, बशी आणि प्लेट्सचा असा वापर तुम्ही पहिला नसेल! पाहा भन्नाट रियुज आयडिया










