advertisement

PPF मध्ये महिन्याची 5 तारीख का महत्त्वाची असते? जाणून घ्या रिटर्नवर कसा होतो परिणाम

Last Updated:
तुमच्यापैकी अनेक लोक हे पीपीएफमध्ये पैसे जमा करत असतील. पण 90% लोकांना 5 तारखेविषयी माहिती नसेल. आज आपण 5 तारखेचं महत्त्वच जाणून घेणार आहोत.
1/7
मुंबई : भारतातील जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित गुंतवणूक हवी असते. याच कारणामुळे सुरक्षित असणारी आणि निश्चित रिटर्न देणाऱ्या पीपीएफ योजनेला अनेकजण पसंती देतात. भारतातील बहुतांश लोक या स्किमध्ये पैसे गुंतवतात. पण त्यांना या स्किममध्ये 5 तारखेचं काय महत्त्व आहे हेच माहिती नसतं. खरंतर 5 तारीख ही खुप महत्त्वाची मानली जाते. कारण पीपीएफ अकाउंटवर मिळणारं व्याज हे दर महिन्याच्या 5 तारखेपासून ते अखेरच्या दिवसापर्यंत किमान बॅलेन्सच्या आधारावर ठरवलं जातं.

2/7
समजा एखादा गुंतवणूकदार महिन्याच्या 5 तारखेनंतर आपल्या पीपीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा करत असेल तर त्याला त्या अतिरिक्त रकमेवर त्या महिन्याचं व्याज मिळणार नाही. म्हणजेच उशीरा गुंतवणूक केल्याने थेट व्याजाचं नुकसान होतं.

3/7
पूर्ण वर्षाच्या व्याजाचं गणित समजून घ्या : समजा तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक केली. ही रक्कम तुम्ही 5 एप्रिल 2026 किंवा त्यापूर्वी जमा केली तर ही रक्कम पूण महिन्याच्या व्याज गणनेत सामिल होईल. अशावेळी मार्च 2027 पर्यंत तुम्हाला पूर्ण वर्षाचं व्याज मिळेल.

4/7
सध्याच्या 7.1 टक्के व्याजदराच्या हिशोबाने वार्षिक व्याज 1,50,000 × 7.1% = 10,650 रुपये होईल. तर मासिक व्याज हे 10,650 ÷ 12 = 887.50 रुपये होईल. पण तुम्ही 5 एप्रिलनंतर ही रक्कम जमा केली. तर त्यांना त्या महिन्याचं व्याज मिळणार नाही. म्हणजेच तुम्हाला एक महिन्याच्या व्याजाचं नुकसान झेलावं लागेल.

5/7
अशावेळी तुम्हाला एकूण वार्षिक व्याजापैकी म्हणजेच 10,650 मधून फक्त 9,762.50 रुपये मिळेल. म्हणजेच तुमचं फक्त एका चुकीमुळे 887.50 रुपयांचं नुकसान होईल. यामुळेच विशेषज्ञ सल्ला देतात की, PPF मध्ये गुंतवणूक नेहमी 5 तारीख किंवा त्यापूर्वी करा. जेणेकरुन प्रत्येक महिना पूर्ण व्याज मिळू शकेल आणि तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त रिटर्न मिळेल.

6/7
PPF मध्ये जास्त व्याज मिळवण्याच्या टिप्स : तुम्ही पीपीएफमध्ये पूर्ण वर्षाचा पूर्ण फायदा उचलू इच्छित असाल. तर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला एकरकमी रक्कम जमा करणं योग्य ठरतं. यामुळे तुमच्या पूर्ण रकमेवर पूर्ण वर्षाचं व्याज मिळतं आणि रिटर्न जास्त होतं. यासोबतच नियमित मासिक गुंतवणूक जारी ठेवणंही फायदेशीर ठरतं.

7/7
इंटरनेट बँकिंगचा वापर करा : योग्य वेळी गुंतवणूक करण्यासाठी इंटरनेट बँकिंगचा ऑप्शन सर्वात बेस्ट आहे. याच्या माध्यमातून तुम्ही दरमहिना सहज आणि योग्य वेळी पीपीएफ अकाउंटमध्ये पैसा जमा करू शकतात. यामुळे लेट होण्याची शक्यता कमी होते आणि तुम्हाला व्याजाचं नुकसान होणार नाही.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement