advertisement

महाराष्ट्रात 'धुरंधर 3', चित्रपट पाहून बाहेर येताच खुनी कांड, मध्यरात्री गँगवॉरमधून तिघांची हत्या

Last Updated:

धुरंधर चित्रपट पाहून बाहेर आलेल्या गँगवर दुसऱ्या गँगने जीवघेणा हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू झाला.

nanded triple murder
nanded triple murder
शुक्रवारी मध्यरात्री नांदेड शहरात झालेल्या गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील एका गँगने दुसऱ्या गँगला संपवण्यासाठी सापळा रचला होता. त्यांनी दबा धरून एका टोळीवर हल्ला केला. मात्र संबंधित टोळीने प्रतिहल्ला केला. यात एकूण तीन जणांचा भयंकर अंत झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. मयत आणि त्यांचे साथीदार सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील काहीजण शुक्रवारी रात्री धुरंधर चित्रपट पाहायला गेले होते. चित्रपट बघून बाहेर येताच ही गँगवॉरची घटना घडली.

नांदेडमध्ये मध्यरात्री काय घडलं?

शुक्रवारी मध्यरात्री नांदेड शहरातील कॅनाल रोड परिसरातील डीमार्टजवळ दोन गँगमध्ये राडा झाला. यात अर्जित सिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ यांचा खून झाला. मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ यांच्या टोळीने अर्जितला मारण्यासाठी दबा धरला होता. त्यांनी धारदार तलवारीने अर्जितवर वार केले. यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला. मात्र यावेळी अर्जितबरोबर असलेल्या काही साथीदारांनी प्रतिहल्ला केला. यात अरबाज आणि आवेझचा देखील मृत्यू झाला.
advertisement

नेमका घटनाक्रम काय?

शुक्रवारी मध्यरात्री नांदेडमध्ये साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये भीषण टोळीयुद्ध झालं. मयत आणि त्यांचे साथीदार हे सर्व रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत गुन्हेही दाखल आहेत. विशेष म्हणजे मयत अर्जितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार होता. काल रात्री अर्जितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन साथीदार ई-स्क्वेअर थिएटरमध्ये 'धुरंधर २' चित्रपट पाहायला गेले होते.
advertisement

दबा धरून अचानक हल्ला

चित्रपट पाहून तिघेही बुलेटवर निघाले होते. याचवेळी साई लाला गँगचे सदस्य मोहम्मद अरबाज, सय्यद आवेझ आणि त्यांचे साथीदार दबा धरून होते. चित्रपट पाहून थोड्या अंतरावर अर्जित सिंह आणि त्याचे सहकारी आले असता दबा धरलेल्या गँगने अचानक हल्ला केला. दोन्ही गँगकडून तलवार, चाकू आणि धारदार शस्त्रांचा वापर केला. त्यात सदा गँगचा अर्जितसिंह चव्हाण आणि साई लाला गँगचा मोहम्मद अरबाज यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement

रुग्णालयात घुसून एकाची हत्या

तर आवेझ आणि अन्य जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. रुग्णालयात अर्जितसिंह चव्हाण याचा भाऊ आणि वडील आले होते. रुग्णालयात जखमी सय्यद आवेझला दाखल करत असताना अर्जितसिंह चव्हाण याच्या भावाने आवेझवर चाकूने वार केले. यात आवेझचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मोठी धरपकड केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितलं. गँगवॉरच्या घटनेमुळे नांदेड शहरात खळबळ उडाली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात 'धुरंधर 3', चित्रपट पाहून बाहेर येताच खुनी कांड, मध्यरात्री गँगवॉरमधून तिघांची हत्या
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement