advertisement

MCA चा नवा थाट! सदस्यांना चक्क अडीच लाखांचे घड्याळ अन् चांदीचे नाणे भेट, चर्चा तर होणारच!

Last Updated:

Mumbai Cricket Association : एमसीएने आपल्या कार्यकारिणी सदस्यांना तब्बल 2.50 लाख रुपये किमतीचे 'रॅडो' कंपनीचे ब्रँडेड घड्याळ आणि 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे भेट दिले आहे

Mumbai Cricket Association
Mumbai Cricket Association
Mumbai Cricket Association : सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विजय मर्चंट, दिलीप वेंगसरकर, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंना मोठं करण्यात सर्वात जास्त मेहनत घेणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) सध्या आपल्या सदस्यांना दिलेल्या महागड्या भेटींमुळे चर्चेत आली आहे.

2.50 लाख रुपये किमतीचे घड्याळ

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या मिळालेल्या माहितीनुसार, एमसीएने आपल्या कार्यकारिणी सदस्यांना तब्बल 2.50 लाख रुपये किमतीचे 'रॅडो' कंपनीचे ब्रँडेड घड्याळ आणि 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे भेट दिले आहे. या अवाढव्य खर्चामुळे क्रिकेट वर्तुळात आता उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

चांदीचं नाणं गिफ्ट

advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत सदस्यांना अशा प्रकारच्या भेटी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावानुसार, प्रत्येक सदस्याला अडीच लाखांचे घड्याळ आणि एमसीएचे बोधचिन्ह असलेले चांदीचे नाणे देण्यात आले. याशिवाय अन्य काही महागड्या वस्तूही दिल्या गेल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, एमसीए ही एक नोंदणीकृत धर्मादाय संस्था असताना एवढा मोठा खर्च केल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement

क्रीडा क्षेत्रात चर्चा

कार्यकारिणी सदस्यांना त्यांच्या कामासाठी कोणतेही मानधन दिले जात नाही, तरीही संघटनेने सदस्यांवर इतकी मोठी मेहेरबानी का केली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. संस्थेच्या निधीचा असा वापर करणे कितपत योग्य आहे, यावरून क्रीडा क्षेत्रात चर्चा रंगली आहे. आता या प्रकरणावर मुंबई क्रिकेट असोसिएशन अधिकृतपणे काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
advertisement

महागडी भेट स्वीकारण्यास नकार

दरम्यान, या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे कारण एका सदस्याने ही महागडी भेट स्वीकारण्यास नकार दिला आहे. या सदस्याने घड्याळ आणि चांदीचे नाणं संघटनेला परत केलं असून तसं पत्रही प्रशासनाला पाठवलं आहे. "आपण क्रिकेटच्या हितासाठी निस्वार्थ भावनेने काम करतो, त्यामुळे अशा महागड्या भेटी स्वीकारणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही," अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतल्याचे समजतंय.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MCA चा नवा थाट! सदस्यांना चक्क अडीच लाखांचे घड्याळ अन् चांदीचे नाणे भेट, चर्चा तर होणारच!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement