advertisement

दाळ शिजण्याचं टेन्शन संपलं, सोलापूरच्या गृहिणीची कमाल, पुरणपोळीसाठी बनवलं प्रिमिक्स, पाहा काय करायचं?

Last Updated:

पल्लवी वाले या उच्चशिक्षित महिलेने झटपट पुरणपोळी प्रिमिक्स हा व्यवसाय सुरू केला आहे. ज्या पुरणपोळीला बनण्यासाठी तासन् तास लागायचे ती पुरणपोळी आता अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये खाण्यासाठी मिळणार आहे.

+
News18

News18

सोलापूर : आजच्या धावपळीच्या जीवनात घरगुती पदार्थ तयार करण्यासाठी वेळ नसतो, अशा काळात उच्चशिक्षित महिलांनी पुढाकार घेऊन नवीन व्यवसाय सुरू केले आहेत. सोलापूर शहरातील विजापूर रोड येथील राहणाऱ्या पल्लवी वाले या उच्चशिक्षित महिलेने झटपट पुरणपोळी प्रिमिक्स हा व्यवसाय सुरू केला आहे. ज्या पुरणपोळीला बनण्यासाठी तासन् तास लागायचे ती पुरणपोळी आता अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये खाण्यासाठी मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती पल्लवी वाले यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
परंपरागत पुरणपोळी बनवण्यास तासन् तास लागतात, त्यामुळे घरात तिचा वापर कमी झाला होता. पल्लवी यांनी वेळेची बचत, आरोग्य आणि घरगुती चव यांचा विचार करून हा प्रिमिक्स तयार केला. शेतकऱ्यांकडून विनापॉलिश हरभऱ्याची डाळ घेऊन केमिकल-मुक्त शिजवली जाते. तेलाचा वापर न करता सेंद्रिय गूळ, हळद आणि वेलची पावडर टाकली जाते. फक्त पाणी मिसळून गोळा करा, कणिक लाटा आणि तव्यावर 5-10 मिनिटांत पुरणपोळी तयार होते.
advertisement
यासोबतच कटाची आमटीचा प्रिमिक्सही उपलब्ध आहेत. त्यात कट, गूळ, चिंच, मसाले, कढीपत्ता पावडर, तिखट-मीठ असून, तेलाची फोडणी देऊन त्यामध्ये पाणी टाकून 10 मिनिटांपर्यंत उकळून घ्यायचं आणि कटाच्या आमटीचा प्रिमिक्स तयार होतो . पुरणपोळीच्या प्रिमिक्सचे पाकीट किंमत 150 ते 800 रुपयांपर्यंत पल्लवी वाले यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामधून त्यांची महिन्याला 1 लाखांची कमाई होते. घरामध्ये सुरू केलेल्या या व्यवसायाने पल्लवी यांनी महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले असून धावपळीतही महाराष्ट्रीय स्वाद जपण्याचा हा प्रयत्न लोकप्रिय होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
दाळ शिजण्याचं टेन्शन संपलं, सोलापूरच्या गृहिणीची कमाल, पुरणपोळीसाठी बनवलं प्रिमिक्स, पाहा काय करायचं?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement