राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत वाढली! वंचितची एन्ट्री, थेट उमेदवाराच्या नावाची केली घोषणा, कुणाची लागली वर्णी?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Rahuri by-election : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वंचित बहुजन आघाडीने राहुरी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे.
अहिल्यानगर : बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांची तारीख जाहीर झाली असून २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 6 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे, तर ६ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या समीकरणात बदल घडवत वंचित बहुजन आघाडीने राहुरी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर
नगर दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीत वंचित बहुजन आघाडीने अनिल भिकाजी जाधव यांना राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. जाधव हे आदिवासी समाजातील तरुण कार्यकर्ते असून सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
advertisement
गोरगरीब, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी एकत्र येत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आघाडीत उमेदवारीबाबत अनिश्चितता
दुसरीकडे, काँग्रेस पक्षाकडूनही राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातून प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून एकत्रित उमेदवार दिला जाणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांना राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकांकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 12:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत वाढली! वंचितची एन्ट्री, थेट उमेदवाराच्या नावाची केली घोषणा, कुणाची लागली वर्णी?








