advertisement

पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या! पुण्यात एका वर्षाच्या बाळाला प्रचंड खोकला, एक्स रे पाहताच डॉक्टरही घाबरले

Last Updated:

ससूनमधील कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. राहुल तेलंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बालकाची तपासणी केली. यावेळी एक्स-रेमध्ये धक्कादायक बाब समोर आली.

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे एका वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवले  (प्रतिकात्मक फोटो)
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे एका वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवले (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : शहरातील ससून सार्वजनिक रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे एका वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवले आहेत. दोन दिवसांपूर्वी खेळताना या चिमुकल्याने लहान दगडाचे तुकडे गिळले होते. सुरुवातीला स्थानिक डॉक्टरांनी हा दगड नैसर्गिकरीत्या मलावाटे शरीराबाहेर पडेल असा सल्ला पालकांना दिला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी बाळाला खोकल्याचे तीव्र झटके सुरू झाल्याने पालक घाबरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ससूनमधील कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. राहुल तेलंग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बालकाची तपासणी केली. यावेळी एक्स-रेमध्ये धक्कादायक बाब समोर आली. बालकाच्या श्वासनलिकेतील मुख्य फाट्याजवळ (कॅरिना) एक कठीण वस्तू अडकली होती. हा दगड उजव्या मुख्य श्वासनलिकेपर्यंत पसरला होता. ज्यामुळे श्वसनास अडथळा निर्माण होऊन बालकाच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता.
advertisement
अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक यल्लप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली. डॉ. राहुल तेलंग, भूलतज्ज्ञ विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. सुषमा आणि बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर यांच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक हा दगड श्वासनलिकेतून बाहेर काढला. वेळेवर उपचार मिळाल्याने मोठा अनर्थ टळला असून सध्या बाळाची प्रकृती स्थिर आणि समाधानकारक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. लहान मुले खेळताना कोणतीही वस्तू तोंडात घालतात. अशावेळी पालकांनी सतर्क राहणे किती गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या! पुण्यात एका वर्षाच्या बाळाला प्रचंड खोकला, एक्स रे पाहताच डॉक्टरही घाबरले
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement