advertisement

आई मला माफ कर! 26 वर्षीय संदेशचं टोकाचं पाऊल, पोलिसांवर आरोप अन्..., शेवटच्या शब्दांनी सगळ्यांना रडवलं!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: दीड वर्षांपूर्वी त्यानं कर्जावर घेतलेला ट्रक चोरीला गेला. याबाबत त्याने रितसर पोलिसांत तक्रार देखील दिली होती.

आई तू दिलेल्या जीवनाचे..., 26 वर्षीय तरुणाचा शेवटचा संदेश, पोलिसांवर आरोप अन् टोकाचं पाऊल, संभाजीनगर हळहळलं
आई तू दिलेल्या जीवनाचे..., 26 वर्षीय तरुणाचा शेवटचा संदेश, पोलिसांवर आरोप अन् टोकाचं पाऊल, संभाजीनगर हळहळलं
छत्रपती संभाजीनगर: जगण्यासाठी एखादा व्यवसाय सुरू करावा म्हणून कर्ज काढून धाडस केलं जातं. मात्र, कधीकधी एखादं संकट अचानक गाठतं आणि क्षणात होत्याचं नव्हतं होतं. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधील एका तरुणासोबत घडला. दीड वर्षांपूर्वी कर्जावर घेतलेला ट्रक चोरीला गेला. मात्र, कर्जाचे हप्ते सुरूच राहिले. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या 26 वर्षीय संदेश दिनकर गवळी या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं. थेट पोलिसांविरोधात सुसाईड नोट लिहून त्याने आत्महत्या केली. या घटनेनं छ. संभाजीनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होतेय.
संदेश हा टँकरचा व्यवसाय करत होता. तो आई-वडील आणि दोन भाऊ, बहिणीसह जय भवानीनगर परिसरात राहात होता. दीड वर्षांपूर्वी त्यानं कर्जावर घेतलेला ट्रक चोरीला गेला. याबाबत त्याने रितसर पोलिसांत तक्रार देखील दिली होती. मात्र, कर्जाचे हप्ते सुरूच राहिले. त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता आणि तो आर्थिक तणावात होता. या नैराश्यातून त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
advertisement
गवळी कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. तेव्हा त्याने घरात विषारी औषध प्यायले. प्रकृती बिघडल्याने त्याला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
सेल्फी काढले अन्...
दरम्यान, आत्महत्येपूर्वी संदेशने एक सुसाईड नोट लिहिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने काही हसरे सेल्फी काढले. हे सेल्फी मित्रांना पाठवून तो विषारी औषध प्यायला. चिठ्ठीत त्याने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनीच ट्रक चोरणाऱ्या माणसाला मदत केली, असा आरोप संदेशने चिठ्ठीतून केला आहे. त्यामुळे त्या दिशेने तपास होणार का? हे पाहावे लागेल.
advertisement
सुसाईड नोट
“मी संदेश दिनकर गवळी आज दिनांक 2.4.2026 रोजी माझी जीवनयात्रा समाप्त करत आहे. त्यासाठी चिकलठाणा पोलीस प्रशासन जबाबदार आहे. ज्यांनी चोरांशी संगनमत करून माझा ट्रक चोरला. चोरांकडून लाच घेऊन साथ दिला व हे अपयश माझ्या माथी मारले. माझ्या मृत्यूसाठी इतर कोणी जबाबदार नसून सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी नेमलेले पोलीस अधिकारी जबाबदार आहेत. माझा एमएच 46 पी 2797 हा ट्रक 6.10.2024 रोजी चोरीला गेला. या ट्रकवर कोटक बँकेचे लोन असून इन्शुरन्स नसल्याने ते पैसे मला भरावे लागत आहेत. 21 लाखाचे कर्ज थकले आहे. त्या माथी मारलेल्या अपयशाला कंटाळून मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. त्यासाठी दुसरं कोणीही जबाबदार नाही. उगाच कोणालाही या गोष्टीसाठी त्रास देऊ नये, ही नम्र विनंती.”
advertisement
“माझ्या शेवटच्या क्षणी लागणाऱ्या खर्चासाठी माफी असावी. माझ्या आईची काळजी घ्यावी. माझे कोटक बँकेचे गाडीसोबत आलेला इन्शुरन्स आहे, त्याची मदत घ्यावी. तुम्ही दिलेल्या जीवनाचे मी सार्थक करू शकलो नाही, आई मला माफ कर,” असं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आई मला माफ कर! 26 वर्षीय संदेशचं टोकाचं पाऊल, पोलिसांवर आरोप अन्..., शेवटच्या शब्दांनी सगळ्यांना रडवलं!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement