सेवानिवृत्त PSI अचानक बेपत्ता, कुटुंबीयांनी फोन केला पण.., ‘ते’ दृश्य पाहून छ. संभाजीनगर हादरलं!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: घुगे हे मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर बाळापूरहून शहराकडे निघाले असताना अचानक बेपत्ता झाले.
छत्रपती संभाजीनगर: सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भीमराव कारभारी घुगे (वय 62) यांचा मृतदेह एका कोरड्या विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली होती. छत्रपती संभाजीनगरच्या बाळापूर शिवारात शुक्रवारी ही घटना घडली. सकाळी 11 च्या सुमारास हा प्रकार पुढे आला. ही आत्महत्या की घातपात याबाबत चिकलठाणा पोलीस शोध घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस दलातून घुगे हे 2023 मध्ये उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. तेव्हा ते क्रांतीचौक पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांना दोन मुले असून ते खासगी कंपनीत नोकरी करतात. तर एक विवाहित मुलगी आहे. सेवानिवृत्तीनंतर घुगे कधी बीड बायपासवर राहणाऱ्या मुलाकडे, तर कधी बाळापूर शिवारातील घरी राहत होते.
advertisement
नेमकं घडलं काय?
गुरुवारी घुगे हे मुलीला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर बाळापूरहून शहराकडे निघाले असताना अचानक बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कॉल किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी सकाळी बाळापूर शिवारातील एका कोरड्या विहिरीत एक व्यक्ती पडल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अग्निशमन विभागाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह हा घुगे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. विहिरीपासून काही अंतरावर घुगेंची दुचाकी आढळली. तर दुचाकीच्या डिक्कीत एक दोरी देखील आढळली. त्यामुळे भीमराव घुगे यांनी आत्महत्याच केली असावी, असा अंदाज आहे. त्यांच्या पार्थिवावर बाळापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.
advertisement
दरम्यान, चिकलठाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच त्यांनी आत्महत्या केली असल्यास त्याची कारणे काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
सेवानिवृत्त PSI अचानक बेपत्ता, कुटुंबीयांनी फोन केला पण.., ‘ते’ दृश्य पाहून छ. संभाजीनगर हादरलं!










