जाणून घेऊयात फ्लॉवर स्वच्छ करण्याच्या सहजसोप्या टिप्स
मीठ पाण्याने धुवावं
बाजारातून फ्लॉवर विकत घेताना ते ताजं असेल याची खात्री करा. कारण शिळ्या किंवा डागळलेल्या फ्लॉवरमध्ये किडे असण्याची शक्यता अधिक असते. भाजी बनवण्यापूर्वी फ्लॉवरचे लहान तुकडे करा. त्यानंतर ते एका पांढऱ्या कपड्यावर पसरवून त्यात कोणता किडा दिसत तर नाही ना ते पाहा. त्यानंतर एका भांड्यात थोडं मीठ आणि पाणी टाकून त्यात त्यात फ्लॉवरचे तुकडे टाका. पाणी मंद आचेवर थोडं गरम करा. जर त्यात किडे असतील तर ते आपोआप बाहेर येतील.
advertisement
हे सुद्धा वाचा : Winter special soups: हिवाळ्यात रमऐवजी प्या हे गरमागरम सूप! मिळेल ताकद, राहाल निरोगी
बर्फाच्या पाण्याने धुवावं
जर तुम्हाला पाणी गरम करायला कंटाळा आला असेल तर कापलेला फ्लॉवर तुम्ही बर्फाच्या पाण्याने धुवू शकता. याचा दुसराही फायदा होईल की शिजवताना फ्लॉवर जास्त गळणार नाही. साफकेल्यानंतर तुम्ही ते प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता.
व्हिनेगरचा वापर
फ्लॉवर स्वच्छ करण्यासाठी तो आधी बारीक कापून घ्या. आता एका वाडग्यात पाणी घ्या आणि त्यात व्हिनेगर मिसळा. यात फ्लॉवर टाका. थोडा वेळ वाट पाहा. व्हिनेगर जंतू, जीवाणू आणि बुरशी काढून टाकण्यास मदत करतो. त्यामुळे जर तुमच्या फ्लॉवरमध्ये किडे असतील तर ते बाहेर येतील. फ्लॉवरमध्ये व्हिनेगरचा अंश नको असेल तर फ्लॉवरपुन्हा एता धुवून मग स्वच्छ पुसून ध्या.
हे सुद्धा वाचा : Kitchen Tips : उन्हाळ्यात दूध लवकर नासतं? वापरा 3 किचन टिप्स, दूध खराब होणार नाही
हळदीचा वापर
जर तुम्हाला व्हिनेगर नसेल वापरायचं तर तुम्ही हळदीचा वापर करू शकता. बारीक कापलेला फ्लॉवर तुम्ही पाण्यात उकळवत ठेवा. त्यात थोडीशी हळद घाला. यामुळे किडे तर बाहेर येतीलच मात्र हळद ही नैसर्गिक अँटिबायोटिक्स असल्यामुळे तो फ्लॉवरमध्ये तुमच्यासाठी अधिक पोषक बनेल.
