Kitchen Tips : रव्यामध्ये नेहमी किडे-अळ्या होतात? या 4 उपायांनी अनेक महिने टिकेल रवा..

Last Updated:

उपमा आणि शिरा म्हणजेच हलवा बनवण्यासाठी लागतो रवा. आपण घरात रवा साठवून ठेवतो. परंतु, बऱ्याचदा रव्याला किडे लागतात किंवा त्यामध्ये अळ्या होतात. अशावेळी रव्यातील बारीक बारीक अळ्या बाजूला काढणं फार अवघड जात.

News18
News18
मुंबई : रोज सकाळी नाश्ता करणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. नाश्त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ घेतो. पोहे, इडली-डोसा, उपमा, शिरा.. यातील उपमा आणि शिरा म्हणजेच हलवा बनवण्यासाठी लागतो रवा. आपण घरात रवा साठवून ठेवतो. परंतु, बऱ्याचदा रव्याला किडे लागतात किंवा त्यामध्ये अळ्या होतात. अशावेळी रव्यातील बारीक बारीक अळ्या बाजूला काढणं फार अवघड जात.
जास्त किडे आणि अळ्या झाल्यामुळे रवा फेकून द्यावा लागतो. यामुळे पैसाही वाया जातो. तुमच्या स्वयंपाकघरातील जार आणि डब्यात ठेवलेला रवा जर असाच खराब झाला असेल आणि त्याला किडे लागले असतील तर तुम्ही तुम्ही प्रसिद्ध शेफ पंकज भदौरिया यांचा हा अगदी सोपा हॅक करून पाहू शकता. शेफ पंकजने हा हॅक त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
advertisement
रवा अनेक महिने टिकवण्यासाठी टिप्स..
शेफ पंकज भदौरिया यांची ही ट्रिक अतिशय आश्चर्यकारक आणि सोपी आहे. यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागणार नाहीत. फक्त कढई किंवा पॅन गरम करा. आता त्यात सर्व रवा घालून मंद आचेवर कोरडा भाजून घ्या. रवा जास्त वेळ भाजू नका. नाहीतर त्याचा रंग बदलेल आणि तो जास्त आचेवर जळू शकतो. तुम्हाला ते इतके भाजायचे आहे की, रव्यातला सर्व ओलावा निघून जाईल. आता गॅस बंद करा आणि रवा थंड होऊ द्या. आता पुन्हा भांड्यात किंवा डब्यात टाकून ठेवा. अशा प्रकारे रवा लवकर खराब होणार नाही.
advertisement
या टिप्समुळे रवा खराब होण्यापासून बचाव होईल..
- रव्यासह डब्यात 8-10 कडुलिंबाची पाने ठेवा. यामुळेही रवा लवकर खराब होणार नाही. थोडी वाळलेली कडुलिंबाची पाने घाला नाहीतर ओलाव्यामुळे रवा खराब होऊ शकतो.
- रव्याच्या डब्यात काही तमालपत्र टाकल्यास ते लवकर खराब होणार नाही. तमालपत्राच्या वासापासून कीटक आणि भुंगे पळून जातात.
- रव्याचे नवीन पॅकेट उघडून डब्यात टाकल्यानंतर त्यावर पुदिन्याची पाने टाका. त्याच्या तीव्र सुगंधामुळे रव्यामध्ये माइट्स आणि कीटक होणार नाही.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : रव्यामध्ये नेहमी किडे-अळ्या होतात? या 4 उपायांनी अनेक महिने टिकेल रवा..
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement