Kitchen Tips : या सोप्या ट्रिक्स वापरून काही मिनिटांत सोला किलोभर लसूण! हातानांही होणार नाही त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
लसूण सोलायचा म्हणल्यावर खूप लोकांना टेन्शन येते. कारण लसूण सोलायचा म्हणजे त्याची साल नखांनी ओढून काढावी लागते. यामुळे नखं मात्र खराब होतात. त्यातही लसूण खूप जात असेल तर नखांना खूप वेदना होतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटात खूप सारा लसूण सोलू शकता.
advertisement
डबा वापरा : लसूण एखाद्या डब्यात किंवा बॉटलमध्ये घ्या. आता डबा बंद करून चांगला हलवा. यामुळे तुम्हाला <a href="https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/benefits-of-keeping-garlic-under-pillow-while-sleeping-garlic-benefits-mhpj-915257.html">लसणाची साल</a> सैल झालेली दिसेल. आता हाताने चोळल्यानंतर सर्व साल निघून जाईल.
advertisement
advertisement
चाकूचा वापर करा : मोठ्या चाकूने <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/kitchen-tips-peel-kilos-of-garlic-in-few-minutes-by-using-these-simple-tricks-mhpj-1188640.html">लसूण</a> थोडा दाबा. लसणाच्या टोकावर दाब दिल्याने त्याची निघास मदत होते. प्रथम लसणाचा वरचा भाग सोलून घ्या. त्यानंतर बाकीची सालही सहज निघते. परंतु ही पद्धत खूप वेळ घेणारी आहे.
advertisement
advertisement


