TRENDING:

Kitchen Tips : साबण न वापरता मातीची भांडी कशी साफ करावी? स्वतः मास्टर शेफनेच दिलं सोल्युशन..

Last Updated:

Clay pot cleaning tips : मातीच्या भांड्यांना साबण लावल्यास त्याला साबणाचा वास लागण्याची शक्यता असते. पण साबणाशिवाय भांड्याचा चिकटपणा आणि मसाल्यांचा वास कसा काढायचा?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मातीची भांडी साफ करणं काहीवेळा अवघड वाटू शकतं. कारण मातीच्या भांड्यांना साबण लावल्यास त्याला साबणाचा वास लागण्याची शक्यता असते. पण साबणाशिवाय भांड्याचा चिकटपणा आणि मसाल्यांचा वास कसा काढायचा? यावरच मास्टर शेफ पंकज भदोरिया यांनी अचूक उपाय सांगितलं आहे. त्यांच्या या युक्तीने मातीची भांडी साफ करणं अगदी सोप्प होणार आहे.
या पद्धतीने साफ करा मातीची भांडी..
या पद्धतीने साफ करा मातीची भांडी..
advertisement

हल्ली बरेच लोक मातीच्या भांड्याचा वापर करत आहेत. कारण इतर धातूंचे अनेक दुष्परिणाम हळूहळू लोकांसमोर येत आहे. पूर्वीच्या काळी नाईलाज वाटणारी मातीची भांडी आता मात्र स्टॅंडर्ड आणि महागडी वस्तू झाली आहेत. म्हणूनच मातीची भांडी वापरताना त्यांची योग्यप्रकारे काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

या पद्धतीने साफ करा मातीची भांडी..

शेफ पंकज यांनी सांगितलं की, 'मातीच्या भांड्यांमध्ये लहान छिद्रे असतात जी साबण शोषून घेतात. म्हणूनच ही भांडी डिशवॉशिंग लिक्विडने अजिबात धुवू नका. कारण केमिकल शोषल्यामुळे नंतर अन्न खराब होण्याची शक्यता असते.

advertisement

- सर्वात आधी भांड्यांवरील तेलकटपणा काढा. यासाठी भांड्यात थोडा लिंबाचा रस आणि पाणी टाकून ते हलकं गरम करा. यामुळे तेलकटपणा भांड्यापासून वेगळा होईल आणि वर येईल त्यानंतर ते पाणी फेकून द्या. याने तेलकटपणा निघून जाईल.

- आता भांडी घासण्याची वेळ आहे, यासातू तांदळाचे पीठ आणि मीठ घ्या. हे दोन्ही घटक भांड्यात टाका आणि त्यावर थोडंसं पाणी टाका. यानंतर स्वच्छ स्क्रबचा साहाय्याने भांडं घासून घ्या आणि नंतर धुवा.

advertisement

- एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. मातीची भांडी घासण्यासाठी चुकूनही स्टीलच्या घासणीचा वापर करू नका. भांडी धुतल्यानंतर ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि उन्हामध्ये ती व्यवस्थित कोरडी होऊ द्या.

- भांड्यांना बुरशी लागली असेल, तर त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा, मीठ आणि व्हिनेगर एकत्र मिसळा, यानंतर स्वच्छ स्क्रबरने घासून घ्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून उन्हात कोरडं करून वापरा.

advertisement

काही महत्त्वाच्या टिप्स..

मातीची भांडी धुतल्यानंतर ती कापडाने व्यवस्थित कोरडी करायला विसरू नका. शिवाय ती काही काळ उन्हाळ ठेवणंदेखील गरजेचं आहे. यामुळे भांड्यांमध्ये बुरशीची वाढ होत नाही. त्याचबरोबर मातीची भांडी जास्त वेळ पाण्यात ठेऊ नका. कारण यामुळं ती आणखी नाजूक, कमकुवत बनू शकतात. शिवाय ती फुटण्याचा धोकाही वाढतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरम मातीची भांडी लगेच पाण्यात टाकू नका. नाहीतर भांड्याला तडा जाऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तृतीयपंथी नेमकं कोण? ‘त्या’ विधेयकानं वातावरण तापलं, LGBTQ समुदाय रस्त्यावर, का होतोय विरोध, Video
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : साबण न वापरता मातीची भांडी कशी साफ करावी? स्वतः मास्टर शेफनेच दिलं सोल्युशन..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल