चाय बार कॅफे ही गणेश पेठे यांची ही संकल्पना आहे. त्यांनी त्यांच्या या संकल्पनेतून चहा मिळण्याचे ठिकाण आणि कॅफे एकत्र आणला आहे. विशेष वेगवगळ्या स्वादाचे चहा, कॅफे मधील नाष्टा मेन्यू आणि बारमध्ये असतो तसा किचन इंटेरियर असा हा कॅफे सध्या सर्वांसाठी आवडीचे ठिकाण बनले आहे. आजकाल चहाचे वेड लागलेल्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे चहामध्ये नावीन्य आणण्याच्या हेतूने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चहा सुरू केले आहेत, असे चाय बार कॅफे चालक विनोद खरात यांनी सांगितले.
advertisement
नाशिकमध्ये गेल्यावर नक्की खा ‘या’ टॉप 6 मिसळ; झणझणीत लाल काळ्या रस्साने मन होईल तृप्त PHOTOS
दुधामध्ये साखर, चाहापुड योग्य प्रमाणात टाकून साधा दुधाचा चहा बनवण्यात येतो. त्यानंतर कुल्हड कपमध्ये वेगवेगळ्या स्वादाची चहाची पावडर टाकण्यात येते. हीच पावडर चहा बनवलेल्या भांड्यात देखील टाकण्यात येते. चहाला उकळी आल्यानंतर हा गरमागरम चहा कुल्हडमध्ये ओतून ग्राहकांना देण्यात येतो. मातीच्या कुल्हड कप मध्ये हा चहा देण्यात येत असल्यामुळे त्याला अजून एक वेगळी चव प्राप्त होते.
कोणकोणत्या प्रकारचे चहा मिळतात..?
चहाप्रेमींची चव बदलण्यासाठी अनेक नवनवीन प्रकारचे चाय बार कॅफेमध्ये देणे सुरू करण्यात आले आहेत. चाय बार कॅफे मध्ये साधा चहा, तुलसी चहा, दालचिनी चहा, आल्ल्याचा चहा, गवती चहा, पुदिना चहा याबरोबरच मँगो, रोज, पाईनॲप्पल, स्ट्रोबेरी, बदाम, व्हेनीला, केसर इलायची, चॉकलेट, रबडी अशा तब्बल 20 प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. तर अमेरीकन आइस-क्रीम चहा, मावा मलई चहा, बटर स्कॉच चहा आणि हॉटेल मॅनेजमेंट स्पेशल चहा असे कधीही न ऐकलेले चहा देखील आपल्याला इथे प्यायला मिळतात.
किती रुपये आहे किंमत ?
चाय बार कॅफे मध्ये मिळणाऱ्या सर्व चहाची किंमत ही 10/- रुपयांपासून 25 रुपयांपर्यंत आहे. साधारणपणे सर्वत्र मिळू शकणारे चहा हे 10/- रुपयांना, फळांच्या स्वादाचे चहा 15/- रुपयांना, अमेरीकन आइस-क्रीम चहा, मावा मलई चहा, बटर स्कॉच चहा हे सर्व 20/- रुपयांना, तर हॉटेल मॅनेजमेंट स्पेशल चहा हा आपल्याला 25/- रुपयांना प्यायला मिळतो.
प्रचंड उकाड्यात लस्सी देईल मनाला थंडावा, याठिकाणी फक्त 30 रुपयांत मिळेल अप्रतिम चव
काय आहे चाय बार कॅफे?
चाय बार कॅफे ही संकल्पना असणाऱ्या गणेश पेठे यांचे कोल्हापुरातील शाहू मैदान खाऊ गल्ली जवळ स्वतःचे कॅफे आहे. तर त्यांच्या फ्रँचायझी देखील कोल्हापुरात आहेत.
1)खासबाग मैदानजवळ खाऊ गल्ली, कोल्हापूर
2) अनंत पॅराडाईज महावीर कॉलेज समोर कोल्हापूर
3)शाहूपुरी, कोल्हापूर
अधिक माहिती साठी संपर्क क्रमांक
विनोद खरात मो. - 9689474796