ठाणे - पास्ता हा सध्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ झाला आहे. गेले अनेक वर्ष आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि यासोबतच स्वतःचा पास्ताचा व्यवसाय सुरू केलेल्या जोडप्याबाबत आपण जाणून घेणार आहोत. कुणाल वर्मा आणि आरती वर्मा असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. डोंबिवलीतील तारा पॅलेस हॉटेलच्या समोर, गणपती मंदिर याच्या अगदी जवळच पास्ता नावाचे एक पास्ता स्टॉल त्यांनी सुरू केला आहे.
advertisement
त्यांच्या इथे मिळणारे व्हरायटीमधील पास्ता डोंबिवलीकरांच्या पसंतीस उतरत आहेत. या पास्ताच्या दुकानात तुम्हाला 5 ते 6 हून अधिक प्रकार मिळतात. यामध्ये व्हाइट सॉस पास्ता, व्हाइट सॉस मशरूम पास्ता, व्हाइट सॉस एक्स्ट्रा चीझी, पिंक सॉस पास्ता, पिंक सॉस मशरूम पास्ता, पिंक सॉस एक्स्ट्रा चीझी पास्ता हे पदार्थ मिळतील. यांची किंमत फक्त 90 रुपयांपासून सुरू होते.
कुणाल वर्मा फायनान्समध्ये आणि आरती या ऑपरेशन्स एमएनसीमध्ये कार्यरत आहेत. दिवसभर ऑफिसवर जाऊन संध्याकाळी हे दोघे मिळून हे पास्ताचे दुकान सुरू करतात. ऑफीसचे काम सांभाळून पुन्हा 6 ते 10 उभ राहुन काम करणे खूप कठीण काम आहे. परंतु हे दोघे आवडीने आणि आनंदाने सगळ्यांना पास्ता बनवून विकतात. लग्न झाल्यानंतर व्यवसाय करावा हा विचार सतत यांच्या मनात येत होता आणि म्हणूनच या दोघांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या या पास्ता फूड शॉपला डोंबिवलीकरांचा खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बाजारातील भाज्यांपेक्षा गावठी भाज्यांना मागणी जास्त, शेतकऱ्याकडून थेट ग्राहकाच्या हातात, VIDEO
'आम्ही पास्ताचे दुकान आता जरी सुरू केले असले तरी माझी पत्नी आरती गेले पाच वर्षे पास्ता बनवत आहे. तिच्या हातचा पास्ता सगळ्यांना खूप आवडायचा. सगळे आवर्जून तिच कौतुक करायचे. तेव्हाच डोक्यात विचार आला की आपण याच पदार्थाचा काहीतरी व्यवसाय करू आणि तिथूनच या व्यवसायाला सुरुवात झाली,' असे कुणाल वर्मा यांनी सांगितले. तर मग तुम्हालासुद्धा मस्त चविष्ट पास्ता खाण्याची इच्छा असेल तर आवर्जून डोंबिवलीतील या पास्ता शॉपला भेट देऊ शकता.