बाजारातील भाज्यांपेक्षा गावठी भाज्यांना मागणी जास्त, शेतकऱ्याकडून थेट ग्राहकाच्या हातात, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
village vegetables - तुलनेत बाजारात येणारी इतर परजिल्ह्यातील भाज्यांचे दर देखील सध्या गगनाला भिडलेले आहेत. हे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सध्या तरी या भाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे.
सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून भाजीपाला येतो. सध्या भाज्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव हे 20 रुपये पाव किलो असे झाले आहेत. तर काही भाज्या या 30 रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. यातच गावठी भाज्यांची आवक बाजारात वाढल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहेत. यातच आता ग्राहकांकडून नेमक्या कोणत्या भाज्यांना मागणी आहे, त्याचे दर काय आहेत, याचबाबत लोकल18 चा हा आढावा.
advertisement
पालेभाज्यांचे दर 20 रुपये, 30 जुडी आहे. गावठी भाज्यांचे दर परवडत असल्याने ग्राहकांची मागणीही त्याला जास्त आहे. स्थानिक गावामधून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली भाजी असल्याने याला बाजारातील भाज्यांपेक्षा मागणी पाहायला मिळत आहे.
गावठी भाज्यांमध्ये पालेभाजी, कणगी, करंदा, चवळी भाजी, मुळा भाजी, वाली, कुळीद, भारंगी, मोहरी भाजी, भेंडी, भोपळा, कारली, दोडके, पडवळ अशा भाज्यांची मागणी बाजारात वाढलेली दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीनंतर भाजीपाल्याची शेती केली जाते. ही भाजी स्थानिक बाजारपेठामध्ये शेतकरी विक्रीसाठी घेऊन येतात.
advertisement
शेतकरी ते ग्राहक अशी ही भाजी मिळत असल्याने या भाजीचे दर कमी असतात. त्यामुळे ग्राहकदेखील या भाजी बाजारात कधी येतात, याची वाट पाहत असतात. तुलनेत बाजारात येणारी इतर परजिल्ह्यातील भाज्यांचे दर देखील सध्या गगनाला भिडलेले आहेत. हे दर सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे सध्या तरी या भाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली पाहायला मिळत आहे.
advertisement
स्थानिक शेतकऱ्यांकडून मिळणारी गावठी भाजी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली असल्याने व ताजी व स्वस्त दरात ही भाजी मिळत असल्याने या गावठी भाजीला मागणी जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. गावठी भाजी खाण्यासाठी देखील चविष्ट असल्याने व पोषक अन्न द्रव्य असल्याने त्याची आवड लोकांना जास्त पाहायला मिळते.
गावठी भाजी ही बाजारात काही विशिष्ट कालावधीत मिळते. खेड्यापाड्यातील लोक भाजीपाल्यावर उदरनिर्वाह करतात. ही भाजी नोव्हेंबर ते एप्रिल, मे महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे या भाजीला मागणी देखील मोठी पाहायला मिळत आहे.
Location :
Sindhudurg,Maharashtra
First Published :
November 18, 2024 2:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बाजारातील भाज्यांपेक्षा गावठी भाज्यांना मागणी जास्त, शेतकऱ्याकडून थेट ग्राहकाच्या हातात, VIDEO