कधी झाली सुरुवात?
या वडापावचे सध्याचे मालक नंदू नायकू आहेत. यांच्या आई-वडिलांनी 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 साली कॅम्पमधील गार्डन भागात हा वडापाव सुरू केला आहे. तेव्हापासूनच हा वडापाव पुणेकर खवय्यांचा लाडका वडापाव म्हणून ओळखला जातो. या वडापावची खासियत म्हणजे हा वडापाव इतर वडापावपेक्षा आकारानं मोठा असतो. तसेच या वडापावसोबत मिळणाऱ्या मिरचीची चव देखील इतर मिरचीपेक्षा वेगळी आहे. तसंच सोबत देण्यात येणारा चटणीही चविष्ट असते, असं ग्राहक सांगतात.
advertisement
समोसा रस्सा राईस खाल्लाय का? एकदा चव चाखाल तर पुन्हा जाल
हा वडापाव एवढा फेमस आहे की वडापाव घेण्यासाठी लोकांची रांग तर लागतेच त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा देखील लोक वडापाव खात उभे असतात. एका वडापावची किंमत 20 रुपये असून दिवसाला पाच ते सहा हजार वडापावची रोज विक्री असते असं नायकू यांनी सांगितले.
कांद्याची साल फेकून देण्यापूर्वी करा विचार, केसांसाठी आहेत आश्चर्यकारक फायदे
सकाळी नऊ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत हा वडापाव उपलब्ध असतो. त्याचबरोबर कुणाला घरपोच वडापाव हवा असेल तर स्विगी किंवा झोमॅटोवरूनही तुम्ही तो मागू शकतो. पुण्यात घरपोच हा वडापाव मिळत असला तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो खाण्याची मजा काही औरच आहे.