कांद्याची साल फेकून देण्यापूर्वी करा विचार, केसांसाठी आहेत आश्चर्यकारक फायदे
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कांद्याप्रमाणेच कांद्याची सालही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. केसांसाठी या सालीचे आश्चर्यकारक फायदे आहेत.
वर्धा, 12 सप्टेंबर: आपण रोजच्या आहारात जे पदार्थ खातो त्यांचं आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्व बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं. आता रोजच्या आहारातील कांद्याची साल आपण कचरा पेटीत टाकून देतो. पण त्याचा केसांसाठी होणारा फायदा माहिती झाला तर तुम्ही अशी चूक कधीच करणार नाही. कारण कांद्याच्या सालीपासून केसांसाठी उपयुक्त टोनर बनवता येऊ शकते. वर्धा येथील ब्युटीशियन प्रीती खडसे यांनी याबाबतच माहिती दिली आहे.
कशी रोखाल केस गळती?
कांदा चिरल्यानंतर कांद्याचे उरलेले भाग आणि त्याची साल एक ग्लास पाण्यामध्ये उकळायची. हे 15-20 मिनिटे उकळू द्यायचे आहे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर केसांना मुळापासून ते टोकापर्यंत चांगलं लावून घ्यायचा आहे. त्यावर हलक्या हाताने मसाज करायचा. सुकल्यानंतर केस धुवून घ्यायचे. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायामुळे तुमचे केस चमकदार सुंदर होतील आणि जर केस गळती होत असेल तर तीही थांबू शकते. तसेच या सोबतच कांद्याच्या सालींबरोबर कढीपत्त्याची पानंही ऍड करू शकता, असे खडसे सांगतात.
advertisement
असेही आहेत फायदे
कांद्याची साल अनेक समस्यांपासून तुमची सुटका करु शकेल. कांद्याच्या सालीचा उपयोग चहा, झाडांना खत, हेअर डाय आणि टॉनिक तयार करण्यासाठी करू शकता. कांद्याच्या सालीमध्ये विटामिन ए, सी, ई, अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण असे अनेक महत्त्वाचे घटक असतात. केसांना सुंदर बनवण्यासाठी कांद्याच्या सालीचे उकळलेले पाणी किंवा किसलेला कांद्याचा रस मुळपासून टोकांपर्यंत लावू शकता. हा उपाय खूप प्रभावी आहे. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा उपाय करून बघावा. याच्या नियमित वापराने आपले केस मुलायम आणि चमकदार होतील, असेही खडसे सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 12, 2023 1:38 PM IST