advertisement

Team India : टीम इंडियाचे 6 दिग्गज 'हवेत' गेले, वर्ल्ड कपच्या पहिल्या 58 मिनिटांमध्येच कुऱ्हाडीवर पाय मारले!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या तासाभरामध्येच टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. खेळपट्टी रंग दाखवत आहे, हे माहिती असतानाही भारतीय खेळाडू गाफील राहिले आणि त्यांनी अमेरिकेच्या खेळाडूंना हलक्यात घेतलं.
1/8
या सामन्यात युएसएने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताचे पहिले 6 खेळाडू 12.4 ओव्हरमध्येच पॅव्हेलियनमध्ये परतले. वानखेडेच्या खेळपट्टीवर बॉल बॅटवर येत नसल्याचं समजत होतं, तरीही भारतीय खेळाडूंनी हवेत शॉट मारले.

2/8
टीम इंडियाचा ओपनर अभिषेक शर्माला पहिल्याच बॉलला सिक्स मारायची होती, त्यामुळे त्याने कव्हरच्या दिशेने शॉट मारला, पण बाऊंड्री लाईनवर त्याचा कॅच पकडला. शून्य रनवर अभिषेक आऊट झाला.

3/8
यानंतर इशान किशनने मिड-ऑफच्या वरून शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण युएसएचा फिल्डर मिलिंद कुमार याच्या हातात बॉल गेला. 16 बॉलमध्ये 20 रन करून इशान पॅव्हेलियनमध्ये परतला.

4/8
भारतीय खेळाडूंमध्ये तिलक वर्मा फॉर्ममध्ये वाटत होता, पण पूल शॉट मारण्याच्या नादात तिलकने मिड विकेटला कॅच दिला. तिलक वर्माने 16 बॉलमध्ये 25 रन केले.

5/8
तिलकची विकेट गेल्यानंतर शिवम दुबेही पहिल्याच बॉलला आऊट झाला. व्हॅन स्कालक्विकने टाकलेला स्लो बाऊन्सर दुबेला समजला नाही आणि फाईन लेगवर सौरभ नेत्रावलकरने कॅच पकडला. व्हॅन स्कालक्विकने एकाच ओव्हरमध्ये इशान, तिलक आणि शिवम दुबे अशा 3 विकेट घेतल्या.

6/8
सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या रिंकू सिंगला बॅटला बॉल लावतानाही संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे हतबल होऊन रिंकूने हवेत बॉल मारला आणि तो आऊट झाला. 14 बॉलमध्ये फक्त 6 रन करून रिंकू माघारी परतला.

7/8
पहिले 5 खेळाडू हवेत शॉट मारून आऊट झालेले माहिती असतानाही हार्दिक पांड्यानेही तिच चूक केली. कव्हरच्या दिशेने सिक्स मारताना युएसएच्या फिल्डरने बाऊंड्री लाईनवर हार्दिकचा कॅच घेतला.

8/8
6 विकेट गेल्यानंतर अक्षर पटेलने सूर्यासोबत 41 रनची पार्टनरशीप केली, पण अक्षरनेही डीप मिड विकेटच्या दिशेने हवेत शॉट मारला. 11 बॉलमध्ये 14 रन करून अक्षर पटेल आऊट झाला.

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement