मुलांना चॉकलेट देण्याची भीती वाटते? मग घरीच बनवा खजूर लॉलीपॉप, पाहा रेसिपी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मुलांना चॉकलेट देण्यापेक्षा चॉकलेट सारखेच खजूर लॉलीपॉप बनवून द्या. पाहा घरातच बनवता येणारी सोपी रेसिपी..
वर्धा, 7 सप्टेंबर: लहान मुलांना चॉकलेट, लॉलीपॉप यासारख्या गोष्टी खायला जास्त आवडतं. चॉकलेटमुळे दात खराब होतात म्हणून पालक त्यांना चॉकलेट खाण्यापासून अडवतात. मात्र तरीही मुलं ऐकत नाहीत. ही परिस्थिती अनेक जण अनुभवत असतील. तर अशावेळी आपण मुलांसाठी घरातच एक खास रेसिपी बनवू शकता. वर्धा येथील आहारतज्ज्ञ सरोज दाते यांनी मुलांसाठी पौष्टिक खजूर लॉलीपॉप कसे बनवयाचे याबाबत माहिती दिलीय.
खजूर लॉलीपॉपसाठी साहित्य
अगदी चॉकलेटसारखं खजूर लॉलीपॉप आपण घरातच बनवू शकता. त्यासाठी साहित्यही सहज उपलब्ध होणारं आहे. अंदाजे 100 ग्राम सिडलेस खजूर, 8-10 पारले बिस्कीट, 35-40 ग्राम काजू, 30 ग्राम मिल्क पावडर, खोबरा किस छोटे 2 चमचे, थोडी मलई अणि दूध या साहित्यात आपण पौष्टिक खजूर लॉलीपॉप बनवू शकतो.
advertisement
काय आहे रेसिपी?
सर्वप्रथम मिक्सरमधून सीडलेस खजूर बारीक करून घ्या. त्यानंतर त्यात बिस्किट अॅड करून तेही बारीक करून घ्या. तुम्ही सुरुवातीलाही बिस्किट बारीक करून घेऊ शकता. त्यात थोडी मलई आणि दूध अॅड करा. आता एका कढईत 1 चमचा तूप घेऊन त्यात बारीक केलेलं मिश्रण अॅड करा. ते गरम होईपर्यंत काजू, खोबराकीस आणि मिल्क पावडर मिक्सर मधून बारीक करून घ्या. हे मिश्रण देखील कढईत अॅड करा आणि चांगलं एकजीव होतपर्यंत चमचा फिरवत राहा.
advertisement
या मिश्रणाचा थोडा कडक सर गोळा बनला पाहिजे. आता हे मिश्रण एका ताटात काढून थोडं कोमट करून घ्या आणि लॉलीपॉप स्टिकवर लावून घ्या. 15 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये ठेवा. आता हे टेस्टी, हेल्दी चॉकलेट म्हणजेच खजूर लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहेत. आहार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे झटपट कृती करून तुम्ही देखील तुमच्या मुलांना अशा प्रकारे हेल्दी चॉकलेट देऊ शकता.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 07, 2023 2:33 PM IST