ज्या महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून 3 लाख लुटले,तिच निघाली मास्टरमाईंड, मिरा रोड प्रकरणाला धक्कादायक वळण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरोपी तरूणाने ज्या महिलेच्या गळ्यावर चाकु ठेवून लुटमार केली होती,तिट महिला या प्रकरणात मास्टरमाईड असल्याच समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
Mira Bhaynder Crime News : दिपाली मिश्रा,प्रतिनिधी, मिरा भाईंदर : मिरा रोड पु्र्वेतील शांती शॉपिंग सेंटरमध्ये एका ऑफिसमध्ये घसून महिलेच्या गळ्यावर चाकु ठेवत 2 लाख 94 हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली होती.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी तरूणाला अटक केली होती. या अटकेनंतर आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आरोपी तरूणाने ज्या महिलेच्या गळ्यावर चाकु ठेवून लुटमार केली होती,तिट महिला या प्रकरणात मास्टरमाईड असल्याच समोर आले आहे.त्यामुळे पोलिसांना देखील धक्का बसला आहे.त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
मिरारोड पूर्व येथील शांती शॉपिंग सेंटर, C-78 मधील एका ऑफिसमध्ये बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास एक अज्ञात इसम शिरला होता.त्याने ऑफिसमध्ये असलेल्या एका महिलेच्या गळ्यावर चाकूचा धाक दाखवत तिच्या जवळील 2 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम लुटून पळून गेला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त व नयानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी यावेळी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सूरू केला होता. या तपासा दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपी मुजम्मिल अब्दुल हाफीज सिद्दीकी (वय 20)याला रे रोड येथून गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले होते.
advertisement
यानंतर तपासादरम्यान या प्रकरणात धक्कादायक वळण समोर आले आहे.ज्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याचा दावा करण्यात आला होता, ती महिला स्वतःच या कटाची सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे चाकू दाखवणारा आरोपी हा तिचाच मित्र असल्याचे समोर आले असून संपूर्ण लूटमार ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेसह एकूण 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात कलम 309(4),329(1)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार व नयानगर गुन्हे प्रकटीकरण पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 10:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
ज्या महिलेच्या गळ्यावर चाकू ठेवून 3 लाख लुटले,तिच निघाली मास्टरमाईंड, मिरा रोड प्रकरणाला धक्कादायक वळण










