बँकेतून 20,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईट बातमी, 161 वर्षे जुन्या बँकेच्या निर्णयाने खळबळ
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Job Cuts: एचएसबीसी बँक एआयचा वापर वाढवत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे सुमारे 20 हजार नोकऱ्यांवर संकट येण्याची शक्यता आहे.
मुंबई : बँकेतील नोकरी सर्वात सुरक्षित मानले जाते. गेल्या काही महिन्यात अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे AI असे म्हटले जाते. मात्र आता एका मोठ्या बँकेतून कर्मचारी कपात होणार असल्याची बातमीने जगाची झोप उडवली आहे.
लंडन मुख्यालय असलेली गुंतवणूक बँक एचएसबीसी येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. एका अहवालानुसार एचएसबीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॉर्जेस एलहेडरी बँकेचे कामकाज अधिक सोपे आणि जलद करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर वाढवण्यावर भर देत आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार विशेषतः ग्राहकांशी थेट संबंध नसलेल्या मिडल आणि बॅक-ऑफिसमधील नोकऱ्यांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. मात्र या संदर्भात सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
advertisement
20 हजार नोकऱ्यांवर टांगती तलवार
या बदलामुळे सुमारे 20,000 नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात, जे बँकेच्या एकूण जागतिक कर्मचाऱ्यांच्या सुमारे 10 टक्के आहेत. याबाबत बँकेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच मध्य-पूर्वेतील अलीकडील तणाव वाढण्यापूर्वीच या बदलांवर चर्चा सुरू झाली होती. 2024 मध्ये CEO पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जॉर्जेस एलहेडरी यांनी बँकेत मोठे बदल सुरू केले आहेत. यामध्ये हजारो कर्मचाऱ्यांची कपात, काही व्यवसायांची विक्री, विलिनीकरण आणि काही विभाग बंद करण्याचे निर्णय आधीच घेतले गेले आहेत.
advertisement
2,10,000 कर्मचारी कार्यरत
2025 च्या अखेरीस एचएसबीसीमध्ये सुमारे 2,10,000 कर्मचारी कार्यरत होते. आता बँक अशा पदांचा पुनर्विचार करत आहे जिथे कर्मचारी स्वतः नोकरी सोडतात, ती पदे पुन्हा भरली जावीत का नाही. याशिवाय काही नोकऱ्या व्यवसाय विक्री किंवा बंद करण्यामुळेही कमी होऊ शकतात.
ही पावले जागतिक बँकिंग क्षेत्रात वेगाने वाढत असलेल्या त्या ट्रेंडचे द्योतक आहेत, जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काम करण्याच्या पद्धती आणि कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर बदलत आहे.
advertisement
पुढील 5 वर्षांत 2 लाख नोकऱ्या कमी होण्याची शक्यता
अहवालानुसार पुढील तीन ते पाच वर्षांत जगभरातील बँका मिळून सुमारे 2 लाख नोकऱ्या कमी करू शकतात. कारण अनेक कामे आता मशीन आणि AI द्वारे केली जाणार आहेत. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येत सरासरी सुमारे 3 टक्क्यांची घट होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 10:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
बँकेतून 20,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईट बातमी, 161 वर्षे जुन्या बँकेच्या निर्णयाने खळबळ







