Video: नॉनव्हेज सोडा अन् एकदा व्हेज ऑम्लेट ट्राय करा, पाहा पौष्टिक रेसिपी

Last Updated:

अंड्याचं ऑम्लेट आपण खाल्लं असेल पण कधी व्हेज ऑम्लेट ट्राय केलंय का? पाहा कसं बनतं व्हेज ऑम्लेट?

+
Video:

Video: नॉनव्हेज सोडा अन् एकदा व्हेज ऑम्लेट ट्राय करा, पाहा पौष्टिक रेसिपी

वर्धा, 30 ऑगस्ट: सकाळचा नाष्टा हा हेल्दी असावा असं म्हणतात. आपण या नाश्त्यासाठी विविध पदार्थ खाल्ले असतील. पण हेल्दी व्हेज ऑम्लेट तुम्ही कधी खाल्लंय का? किंवा हेल्दी व्हेज ऑम्लेट कसं बनवतात हे तुम्हाला माहितीये का? वर्धा येथील गृहिणी दर्शना काळे यांनी विविध पौष्टिक डाळींपासून हेल्दी नाश्ता तयार केलाय. याच पौष्टिक व्हेज ऑम्लेटची रेसिपी आपण पाहणार आहोत.
व्हेज ऑम्लेटसाठी साहित्य
व्हेज ऑम्लेट तयार करण्यासाठी घरातीलच साहित्य लागणार आहे. 10-12 बदाम, 2 मुठ शेंगदाणे, 1 मूठ मसूरची डाळ, 1 मूठ चण्याची डाळ, 2 मूठ मूग डाळ, 1 मूठ उडदाची डाळ (मोड आलेले कडधान्य आपण वापरू शकतो), खोबरं, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, मीठ, जिरे, कढीपत्त्याची पानं, लसूण कळ्या हे साहित्य आवश्यक आहे.
advertisement
कसं बनवायचं व्हेज ऑम्लेट?
सर्व डाळी, शेंगदाणे आणि बदाम रात्रभर भिजत घालायच्या आहेत. सकाळी नाश्ता बनवताना मिक्सरमधून बारीक करताना त्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, पाच-सहा खोबऱ्याचे तुकडे, जिरं आणि कढीपत्त्याची पाने छान बारीक करून घ्यायची आहेत. आता हे सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये काढून पाणी ऍड करून घ्यायचे आहे. तसेच त्याचे एकत्रित मिश्रण तयार करायचे आहे. त्याचा डोसा बनवता येईल इतपत ते पातळ असावं. आता नॉनस्टिक तव्याला तेल लावून घेऊन तवा जास्त गरम नसतानाच डोसा पसरवून घ्यायचा आहे. त्यावर तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकू शकता. दोन्ही बाजूने चांगला शेकून घेतल्यानंतर आता हा व्हेज ऑम्लेट तयार आहे. तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत ऑम्लेट खाऊ शकता.
advertisement
..म्हणून पडले व्हेज ऑम्लेट नाव
डाळी पोषक घटकांनी परिपूर्ण असतात. त्यामुळे डाळीचा आहारात अवश्य समावेश करा असा सल्ला आहार तज्ज्ञ देत असतात. डाळींमधून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. आपला आहार चांगला असला की शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मोड आलेले कडधान्य खाल्ले की त्याचाही आपल्या निरोगी शरीरासाठी खूप फायदा आहे. पौष्टिक डाळींपासून बनलेला हा डोसा अंड्याच्या ऑम्लेट सारखा दिसतो आणि त्याची चवही काहीशी अंड्याच्या ऑम्लेट प्रमाणे लागते. त्यामुळे या डोस्याला हेल्दी व्हेज आमलेट असंही आपण म्हणूच शकतो. घरातील चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी असून याचे शरीराला फायदे आहेत. त्यामुळेच सकाळच्या नाश्त्यासाठी डाळींपासून बनलेला हेल्दी डोसा म्हणजेच व्हेज ऑम्लेट तुम्ही नक्कीच ट्राय करा.
मराठी बातम्या/रेसिपी/
Video: नॉनव्हेज सोडा अन् एकदा व्हेज ऑम्लेट ट्राय करा, पाहा पौष्टिक रेसिपी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement