Video : अळूच्या पानांनी घसा खवखवतो? तर अशी बनवा 15 मिनिटात धोप्याची वडी

Last Updated:

अळूच्या पानांनी घसा खवखवत असेल तर विदर्भातील या पद्धतीनं धोप्याची वडी बनवा आणि मनसोक्त खा.

+
Video

Video : अळूच्या पानांनी घसा खवखवतो? तर अशी बनवा 15 मिनिटात धोप्याची वडी

वर्धा, 14 ऑगस्ट: विदर्भात अळूच्या पानांची वडी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. अळूच्या पानांना विदर्भात धोपा असेही म्हणतात. धोप्याची वडी खाल्ल्यावर अनेकांना गळ्याला खाज सुटते किंवा गळ्यात त्रास होतो. या भीतीने ही वडी खाणे अनेकजण टाळतात. मात्र, धोप्याच्या पानांची वडी योग्य पद्धतीने बनविली तर कोणताही त्रास होत नाही. याबाबतच वर्धा येथील गृहिणी कीर्ती अलोणे यांनी खास रेसिपी सांगितली आहे.
अळू म्हणजेच धोप्याचे फायदे
अळूच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. अळूचे पान थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात. अशक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात. तापामुळे जीभेची चव जाते. त्यामुळे कोणतंच अन्न चविष्ट लागत नाही. पण अळूच्या पानामुळे चव परत येते, असं गृहिणी सांगतात. अळूच्या पानांची वडी किंवा अळूच्या पानांची भाजी देखील बनविली जाते. अळूची वडी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुरकुरीत किंवा नरम देखील तळू शकता. अतिशय कुरकुरीत रेसिपी ही मुलांना खूप आवडते आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
advertisement
अळूच्या वडीसाठी साहित्य
घरी उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून धोप्याची वडी अगदी 15 -20 मिनिटात बनून तयार होते. त्यासाठी धोप्याची पाने, चण्याच्या डाळीचे पीठ (बेसण), तिखट, मीठ, तेल, आलं लसूण पेस्ट, दही किंवा लिंबू, हिरव्या मिरचीची पेस्ट असे साहित्य लागेल. हे साहित्य योग्य प्रमाणात घ्यावे.
advertisement
धोप्याच्या वडीची रेसिपी
धोप्याच्या पानांना लावण्यासाठी आपल्याला आधी बेसन भिजवून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जर तुमच्याकडे सहा पाने असतील तर त्यासाठी दोन वाट्या बेसन आपल्याला लागेल. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये दोन वाट्या बेसन घेऊन त्यात तिखट, मीठ, आलं लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, तेलाचं मोहन, दही किंवा लिंबू अॅड करून पाण्याने घट्टसर भिजवून घ्यायचे. धोप्याची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे देठ काढून टाका. त्यानंतर पान पालथे ठेऊन त्यावर भिजवलेले बेसन लावा. असे एकावर एक तीन पाने ठेवा आणि त्याची घडी करून घ्या. आता ते कुकर मध्ये 10 मिनिटं वाफवून घ्या. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या आणि गरम तेलात कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्या. गरमागरम वड्या खायला अतिशय स्वादिष्ट लागतात.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Video : अळूच्या पानांनी घसा खवखवतो? तर अशी बनवा 15 मिनिटात धोप्याची वडी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement