advertisement

Vitamin D : भारतात भरपूर ऊन असूनही 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता का ? सत्तर टक्के भारतीयांमधे 'व्हिटॅमिन डी'ची उणीव

Last Updated:

भारत देशात वर्षातील बहुतांश काळ मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. तरीही, बहुतेक भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. हे धक्कादायक सत्य आहे. ज्या देशात सूर्यप्रकाशाची कमतरता नाही अशा देशात लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने का ग्रस्त आहेत? त्याची अनेक कारणं आहेत.

News18
News18
मुंबई : बहुतेक घरांमधे व्हिटॅमिन डी ची गोळी घ्यावी लागणारे एक दोन जण असतातच. पण हे प्रमाण भारतात किती आहे तुम्हाला माहित्ये.
भारत देशात वर्षातील बहुतांश काळ मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो. तरीही, बहुतेक भारतीयांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. हे धक्कादायक सत्य आहे.
ज्या देशात सूर्यप्रकाशाची कमतरता नाही अशा देशात लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने का ग्रस्त आहेत? त्याची अनेक कारणं आहेत.
मेलेनिन - भारतीयांची त्वचा नैसर्गिकरित्या गव्हाळ किंवा गडद रंगाची असते. आपल्या त्वचेमधे मेलेनिन नावाचं रंगद्रव्य जास्त प्रमाणात असतं. मेलेनिन सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतं, त्वचेला जळण्यापासून रोखतं, पण ते व्हिटॅमिन डीचं उत्पादन कमी करतं.
advertisement
दुसरा मुद्दा म्हणजे बदलती जीवनशैली - आजची बहुतेक लोकसंख्या घरातच राहते. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डेस्क जॉब, बंद ऑफिस आणि वातानुकूलित खोल्या यामुळे आपण सूर्यापासून दूर राहतो. शहरी भागात उंच इमारती थेट सूर्यप्रकाश घरांपर्यंत पोहोचू देत नाहीत.
advertisement
तिसरं म्हणजे प्रदूषण - महानगरांमधे वाढतं वायू प्रदूषण हा देखील एक प्रमुख घटक आहे. हवेतील धुळीचे कण आणि धूर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांना आपल्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात, ज्यामुळे व्हिटॅमिन डीचे उत्पादन रोखलं जातं.
आहारातील बदल - आहारात व्हिटॅमिन डीचे नैसर्गिक स्रोत खूप मर्यादित आहेत, चरबीयुक्त मासे, अंड्याचा पिवळा भाग आणि दुग्धजन्य पदार्थ. भारतातील मोठी लोकसंख्या शाकाहारी आहे.
advertisement
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं -
हाडं आणि सांध्यांमधे सतत वेदना
सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं
स्नायूंचा ताण
नैराश्य किंवा चिडचिड
वारंवार आजारी पडणं
'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेवर उपाय -
सूर्यप्रकाशासाठी योग्य वेळ: सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत किमान पंधरा-वीस मिनिटं उन्हात घालवा. या काळात अतिनील किरणं सर्वात प्रभावी असतात.
advertisement
आहारातील बदल: आहारात मशरूम, फोर्टिफाइड दूध, दही आणि चीज समाविष्ट करा.
पूरक आहार: सतत थकवा जाणवत असेल तर रक्त तपासणी करा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स घेण्यानं या जीवनसत्वाची कमतरता भरून निघू शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamin D : भारतात भरपूर ऊन असूनही 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता का ? सत्तर टक्के भारतीयांमधे 'व्हिटॅमिन डी'ची उणीव
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement