advertisement

Bloating : पोटफुगीच्या त्रासावर डॉक्टरांनी सांगितलेत उपाय, पोटदुखी, गॅस, अस्वस्थ वाटणं होईल कमी

Last Updated:

उन्हाळ्यात काहीवेळा पोट बिघडू शकतं. उन्हाळ्यात काकडीसारखे हायड्रेटिंग पदार्थ खाल्ल्यानं प्रकृती शांत राहते पण मसालेदार पदार्थांमुळे पोटात गडबड होऊ शकतो. तसंच कधीकधी आपण घाईघाईने जेवतो, अनेकदा यामुळेही पोटदुखी, गॅस आणि अस्वस्थता जाणवते. यावर गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही टिप्स शेअर केल्या आहेत. ब्लोटिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी या टिप्सची मदत होऊ शकते.

News18
News18
मुंबई : उन्हाळा सुरु झाला की पोटाची गडबड वाढते, काहींना पोटात जळजळ होणं, पोट फुगणं अशा समस्या जाणवतात. पोटफुगी म्हणजे ब्लोटिंगची समस्या का जाणवते आणि ती दूर करण्यासाठी काय करावं याविषयी जाणून घेऊया.
उन्हाळ्यात काहीवेळा पोट बिघडू शकतं. उन्हाळ्यात काकडीसारखे हायड्रेटिंग पदार्थ खाल्ल्यानं प्रकृती शांत राहते पण मसालेदार पदार्थांमुळे पोटात गडबड होऊ शकतो. तसंच कधीकधी आपण घाईघाईने जेवतो, अनेकदा यामुळेही पोटदुखी, गॅस आणि अस्वस्थता जाणवते. यावर गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही टिप्स शेअर केल्या आहेत. ब्लोटिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी या टिप्सची मदत होऊ शकते.
advertisement
गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉ. सेठी यांच्या मते, पुदिन्याच्या चहामुळे पोटाच्या स्नायूंना आराम मिळतो. पोटातील सूज कमी करायची असेल तर पुदिन्याचा चहा हा चांगला पर्याय आहे. पुदिन्यात मेन्थॉल नावाचा घटक असतो. यामुळे आपल्या पचनसंस्थेतील स्नायूंना आराम मिळू शकतो.
advertisement
स्वयंपाकघरातील एक मुख्य पदार्थ, बडीशेप ही चव आणि आरोग्याचा खजिना आहे. डॉक्टर सेठी जेवणानंतर बडीशेप चघळण्याची शिफारस करतात, यामुळे पोट फुगण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. बडीशेपेमुळे पोटातील अतिरिक्त वायू बाहेर काढण्यास मदत होते. पोटफुगीवर मात करण्यासाठी, हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
अनेकदा, आपल्याला पोटफुगीचं खरं कारण कळत नाही. डॉक्टरांच्या मते, अनेकांना लॅक्टोजचा त्रास होतो. याचा अर्थ त्यांचं शरीर दूध किंवा चीज, दही आणि मिठाई यांसारखे दुग्धजन्य पदार्थ योग्यरित्या पचवू शकत नाही. दूध प्यायल्यानंतर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर तीस मिनिटांपासून दोन तासांच्या आत पोटफुगी जाणवत असेल, तर दूध हे मूळ कारण असू शकतं. यामुळे तुम्ही काही दिवस दूध टाळू शकता.
advertisement
अनेकजण, उन्हाळ्यात, कोल्ड्रिंक्स किंवा सोडा पितात. या कार्बोनेटेड पेयांमधे कार्बन डायऑक्साइड वायू असतो. ही पेय पिता तेव्हा थेट पोटात गॅसचे बुडबुडे पाठवत असता. हे बुडबुडे तुमच्या पोटात आणि आतड्यांमध्ये अडकतात, ज्यामुळे ढेकर येणं, पोट फुगणं आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवतात. पोट हलकं ठेवायचं असेल तर कार्बोनेटेड पेय मर्यादित प्रमाणात प्या.
advertisement
जास्त फायबर खाऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर हे टाळा. कारण डॉक्टरांच्या मते, फायबर शरीरासाठी चांगलं आहे, पण ते हळूहळू वाढवावं. अचानक जास्त फायबर खायला सुरुवात केली तर तुमच्या आतड्यांतील बॅक्टेरियांना ते पचवण्यास त्रास होईल. यामुळे पोटात पेटके, वेदना आणि अतिसार देखील होऊ शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bloating : पोटफुगीच्या त्रासावर डॉक्टरांनी सांगितलेत उपाय, पोटदुखी, गॅस, अस्वस्थ वाटणं होईल कमी
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement