वयाच्या 75 व्या वर्षी अभिनेत्रीचं निधन, 7 वर्षांआधी राहत्या घरात नवऱ्याचा मृत्यू; 3 दिवसांनंतर मिळाला होता मृतदेह
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'सत्ते पे सत्ते' फेम अभिनेत्रीचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. अभिनेत्रीच्या निधनाच्या 7 वर्ष आधी तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ज्यामुळे इंडस्ट्री हादरली होती.
advertisement
advertisement
advertisement
महेश केवळ एक अभिनेता नव्हते तर ब्लॅक बेल्ट असलेला एक कुशल मार्शल आर्टिस्ट देखील होते. त्यांनी 'सनम तेरी कसम' या चित्रपटातून नर्तक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या मजबूत व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना अमिताभ बच्चन, रजनीकांत, कमल हासन, सलमान खान, विनोद खन्ना आणि मोहनलाल यांच्यासोबत प्रमुख भूमिका मिळाल्या.
advertisement
advertisement
अभिनेत्री मधु मल्होत्रा या महेश आनंद यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. पण त्यांचा संसार फारकाळ टिकला नाही. डिवोर्सनंतर मधु मल्होत्रा लाइम लाइटपासून दूर राहिल्या. त्याचप्रमाणे 2000 च्या दशकापर्यंत महेश आनंद देखील चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे गायब झाले होते. एकेकाळी खतरनाक खलनायक साकारून महेश यांनी प्रेक्षकांना घाबरवलं होतं. त्याच महेश आनंद यांच्या आयुष्यात अत्यंत वाईट शेवट झाला.
advertisement
फेब्रुवारी 2019 मध्ये या महेश आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह जवळपास 3 दिवस घरात पडून होता. त्यांच्या घराबाहेर दुधाची पाकिटं साचू लागली. त्यांच्या मोलकरणीने दार ठोठावलं पण आतून काही प्रतिसाद आला नाही. तीन दिवस हा प्रकार सुरू राहिल्यानंतर मोलकरणीने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी दार उघडलं तेव्हा महेश आनंद मृतावस्थेत आढळले. त्यांच्यात हातात दारूच्या बाटल्या होत्या.







