Hyundai Verna किती पगार असलेल्या लोकांनी खरेदी करावी? पाहा EMIचं गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी त्या कारच्या पैशांचं गणित लावणं खुप गरजेचं असतं. तुम्ही ईएमआयवर कार खरेदी करणार असाल तर हे अत्यंत महत्वाचं ठरतं. आज आपण 2026 Hyundai Verna च्या ईएमआयचं गणित जाणून घेऊया.
2026 Hyundai Verna ही नुकतीच नव्या अपडेटसह लॉन्च झाली आहे. तुम्हाला ही कार खरेदी करायची इच्छा असेल पण ईएमआयचं गणित कसं असेल हे कळत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण किती पगार असलेल्या लोकांनी ही गाडी खरेदी करायला हवी आणि ईएमआयचं गणित कसं असेल हे आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
advertisement
advertisement
वर्नाची एक्स शोरूम प्राइज ही 10.98 लाख रुपयांपासून सुरू होते. तुम्ही ही दिल्लीमध्ये खरेदी करू इच्छित असाल तर Verna च्या बेस व्हेरिएंटवर तुम्हाला 1,21,840 रुपये RTO फीस द्यावी लागेल. यासोबतच 54,447 रुपयांचं इन्शुरन्स अमाउटं आणि 11,484 रुपयांचे इतर चार्जेस द्यावे लागू शकतात. अशा प्रकारे हुंडई वर्नाची ऑन रोड किंमत 12,86,171 रुपये होते.
advertisement
advertisement
advertisement










