advertisement

APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्ष आणि कांद्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा

Last Updated:

शनिवार, दिनांक 14 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक व भाव पाहू.

+
News18

News18

सांगली: राज्यातील कृषी मार्केटमध्ये वेगवेगळ्या पिकांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. शनिवारी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहूयात.
कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 31 हजार 921 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 65 हजार 207 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 344 ते 1177 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 448 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
राज्याच्या मार्केटमध्ये आज 401 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी नागपूर बाजारात आवक झालेल्या 91 क्विंटल लिंबूला 8000 ते 12000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 47 क्विंटल लिंबूला 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
द्राक्ष आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 295 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 117 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 10000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
केळीची आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 262 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 140 क्विंटल केळीला प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: लिंबाचे दर तेजीत, द्राक्ष आणि कांद्याला काय मिळाला भाव? इथं चेक करा
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement