advertisement

New Rules: ज्यांच्याकडे PNGआहे त्यांना मिळणार नाही LPG गॅस सिलिंडर; काय आहे नवा नियम

Last Updated:
New Rules: केंद्र सरकारने गॅस कनेक्शनबाबत कडक पाऊल उचलले असून, आता एकाच घरात LPG सिलेंडर आणि PNG पाईपलाईन दोन्ही वापरण्यावर बंदी घातली आहे. ज्या ग्राहकांकडे पीएनजी सुविधा आहे, त्यांना आता आपले घरगुती एलपीजी सिलेंडर तात्काळ सरेंडर करावे लागणार आहे.
1/9
देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत.
देशातील इंधन पुरवठ्यावर वाढता ताण आणि सबसिडीचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारने गॅस कनेक्शनच्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत.
advertisement
2/9
पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने (MoPNG) जारी केलेल्या नवीन आदेशानुसार आता ज्या ग्राहकांच्या घरी पाईपलाईनद्वारे गॅस (PNG) पुरवठा होतो, त्यांना घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडर वापरता येणार नाही.

3/9
काय आहे नवा नियम?मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच कुटुंबात पीएनजी आणि एलपीजी अशा दोन्ही सुविधा असण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांचे एलपीजी सिलेंडर तात्काळ सरेंडर (परत) करावे लागणार आहे.
काय आहे नवा नियम? मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार एकाच कुटुंबात पीएनजी आणि एलपीजी अशा दोन्ही सुविधा असण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ज्या ग्राहकांकडे आधीपासूनच पीएनजी कनेक्शन आहे, त्यांना त्यांचे एलपीजी सिलेंडर तात्काळ सरेंडर (परत) करावे लागणार आहे.
advertisement
4/9
इतकेच नाही तर अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडरचे रिफिल बुकिंग देखील करता येणार नाही. भविष्यातही पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इतकेच नाही तर अशा ग्राहकांना आता नवीन सिलेंडरचे रिफिल बुकिंग देखील करता येणार नाही. भविष्यातही पीएनजी वापरकर्त्यांना नवीन एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
5/9
सबसिडीचा गैरवापर रोखणे: अनेक ग्राहक शहरात पाईप गॅस असूनही स्वस्त दरातील सबसिडीचे सिलेंडर राखून ठेवतात, ज्यामुळे गरजूंपर्यंत गॅस पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.
सबसिडीचा गैरवापर रोखणे: अनेक ग्राहक शहरात पाईप गॅस असूनही स्वस्त दरातील सबसिडीचे सिलेंडर राखून ठेवतात, ज्यामुळे गरजूंपर्यंत गॅस पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.
advertisement
6/9
इंधन टंचाईचे सावट: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठ्यावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
इंधन टंचाईचे सावट: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठ्यावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
advertisement
7/9
गरजू ग्राहकांना प्राधान्य: सध्या सिलेंडरच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली आहे. दररोजच्या ७५ लाख सिलेंडर बुकिंगचा आकडा आता ८८ लाखांवर पोहोचला आहे. त्यामुळे हा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

8/9
प्रशासनाचा 'सर्च ऑपरेशन'चा इशारा:देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आता कडक झाले आहे. गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात विशेष पथकांद्वारे अचानक तपासणी आणि छापे टाकले जात आहेत. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
प्रशासनाचा 'सर्च ऑपरेशन'चा इशारा: देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन आता कडक झाले आहे. गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात विशेष पथकांद्वारे अचानक तपासणी आणि छापे टाकले जात आहेत. घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
advertisement
9/9
ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना:ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांनी स्वेच्छेने आपले एलपीजी कनेक्शन जवळच्या वितरकाकडे जमा करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास गॅस पुरवठा खंडित होण्यासोबतच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना: ज्यांच्याकडे पीएनजी कनेक्शन आहे, त्यांनी स्वेच्छेने आपले एलपीजी कनेक्शन जवळच्या वितरकाकडे जमा करावे. नियमांचे उल्लंघन केल्यास गॅस पुरवठा खंडित होण्यासोबतच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
advertisement
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement