Mumbai Local block: लोकल गाड्या रद्द होणार, ठाणे ते डोंबिवली स्टेशनदरम्यान रात्रीपासून पॉवरब्लॉक, संपूर्ण वेळापत्रक
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आज रात्रीपासून उद्या (रविवारी) सकाळपर्यंत प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकच्या काळामध्ये रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणि रविवारी सकाळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे.
मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाणे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी मध्यरा‍त्री 12 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे रात्री ठाणे ते कल्याण किंवा त्यापूढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
advertisement
शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत ठाणे ते डोंबिवली स्थानकादरम्यान मध्य रेल्वेकडून विशेष पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार असून रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हा विशेष पॉवरब्लॉक घेतला जाणार आहे. याचा परिणाम धीम्या मार्गावर धावणाऱ्या लोकल सेवेवर होणार आहे.
advertisement
ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. 3 आणि 4 च्या विस्तारासाठी आणि डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म नं. 1 A, 1 आणि 2 च्या विस्तारासाठी डाऊन आणि अप धीम्या मार्गावर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. तर, रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू असेल. मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली स्थानका दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे.
advertisement
ब्लॉकच्या काळामध्ये धीम्या मार्गावरील अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही लोकल गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर काही गाड्यांना थांबा मिळणार नाही. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी जलद मार्गावरील लोकलला कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत.
advertisement
advertisement
शनिवारी रात्री 10.49 मिनिटांनी परळ स्थानकावरून सुटणारी आणि मध्यरात्री 12.12 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावरून सुटणारी डाऊन धीमी लोकल आणि रविवारी पहाटे 04.45 वाजता विद्याविहारहून सुटणारी आणि सकाळी 09.05 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीहून सुटणारी लोकल मुलुंड स्थानकावरून डाऊन जलद मार्गावर वळवले जाईल आणि त्यानंतर ठाणे स्थानकावरून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवले जाईल.
advertisement
तर, डाऊन धीमी लोकल डाऊन जलद मार्गावरून वळवली जाईल. त्यामुळे या लोकल कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. शनिवारी रात्री 11.26 ते रात्री 11.52 आणि मध्यरात्री 03.23 ते सकाळी 09.55 या वेळेत कल्याणवरून सुटणारी अप धीम्या मार्गावरील लोकल कल्याणवरून अप जलद मार्गावर वळवली जाईल. त्यामुळे या लोकल ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.








